धर्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून समाज अन् देश यांचा उद्धार शक्य ! – गोव्याचे राज्यपाल पी. एस्. श्रीधरन् पिल्लई

१ मार्चपर्यंत चालणार्‍या या परिषदेत व्याख्याने, प्रदर्शन आणि वैज्ञानिकांसह संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. परिषदेमध्ये देशातील अनेक वैज्ञानिक, उद्योगिक संस्थांचे अिधकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

सरकारने गुन्हे मागे न घेता उलटपक्षी दोषींवर कठोर कारवाई करावी ! – शिवप्रेमींची दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पंचायतीची अनुमती न घेता पुतळा उभारल्याचा स्थानिकांचा आरोप असल्यास त्यांनी हा प्रश्न योग्य व्यासपिठावर मांडला पाहिजे होता. कायदा हातात घेण्याचा अधिकार या नागरिकांना कुणी दिला ?

मराठी भाषेचा विकास हे व्यक्ती आणि समाज यांचे दायित्व ! – मकरंद मुळे

मराठी भाषेचे जतन करून ती पुढच्या पिढीत रुजवण्याचे काम प्रत्येकाने आपले घरचे कार्य मानून करण्याची आवश्यकता आहे, असे ‘पु.ल. देशपांडे कला अकादमी’चे सदस्य आणि पत्रकार मकरंद मुळे यांनी वाशी येथे केले.

‘शिवगर्जना’ महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला प्रारंभ झाला.

गोवा : (म्हणे) ‘बाहेरून येऊन तणाव निर्माण करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !’ – स्थानिक ग्रामस्थांची मागणी

चोराच्या उलट्या बोंबा ! – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून परतत असतांना समाजकल्याणमंत्र्यांवर मातीचे गोळे फेऊन आक्रमण केल्याने तणाव निर्माण झाला. गावाबाहेरील लोक गावात आल्याने तणाव निर्माण झालेला नाही !

माणगांव येथील दत्तमंदिरात आजपासून श्री सौर दत्तयागाचे आयोजन 

तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत श्री सौर दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून अखंड नामस्मरणास प्रारंभ होणार आहे.

आदर्श शिवजयंती साजरी करणारे बोईसर येथील मुरबे गाव !

राष्ट्र आणि धर्मरक्षणाचा आदर्श देणार्‍या मुरबे ग्रामस्थांचे अभिनंदन !

(म्हणे) ‘दंगल घडवणार्‍यांवर नोंद केलेले गुन्हे मागे घ्या !’ – गोव्यातील काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करावी लागणे, हे दुर्दैवी आहे ! – सागर बेग, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय श्रीराम संघ

श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित धर्मसभा !

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत, चैतन्याचे स्त्रोत आहेत. ते टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. मंदिरांचे पावित्र्य राखणे, संघटन करणे, सुव्यवस्थापन करणे हे सर्व कार्य ईश्‍वराचे अधिष्ठान ठेवून करणे आवश्यक आहे.