कुडाळ – तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत श्री सौर दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून अखंड नामस्मरणास प्रारंभ होणार आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजता अखंड नामस्मरण समाप्ती, श्रींचे जन्मस्थान आणि प.पू. नांदोडकर स्वामी समाधी स्थान यांवर अभिषेक पूजा, श्री सौर दत्तयागांतर्गत धार्मिक विधी, दुपारी १ वाजल्यापासून तबला, पखवाज आणि सोलो यांचे वादन; गीतरामायण गायन, दुपारी ३ वाजता येथील गुहेवर श्री सत्यदत्तपूजा, रात्री ९ वाजता कीर्तन, २५ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ६ या वेळेत भजन, गायन; रात्री ९ वाजता कीर्तन, २६ फेब्रुवारी या दिवशी श्री दत्तमंदिरात सकाळी ८ वाजल्यापासून अभिषेक पूजा, श्री सौर दत्तयाग बलीदान, पूर्णाहुती, महानैवेद्य, आरती आणि मंत्रपुष्प; दुपारी १ वाजता ‘श्री द्विसाहस्री गुरुचरित्र आणि पंचपदी निर्मिती’ यावर प्रवचन, त्यानंतर भजन, गायन, तालसंध्या, गोफनृत्य आणि रात्री कीर्तन, असे कार्यक्रम होणार आहेत, तसेच उत्सव कालावधीत प्रतिदिन नैमित्तिक पूजा, श्री सौर दत्तयाग जप आणि हवन; दुपारी आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद; सायंकाळी ६.४५ वाजता आरती, श्रींचा पालखी सोहळा, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्तमंदिर, माणगांव न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.