आषाढीच्या वारीला केवळ महत्त्वाच्या १० पालख्यांना अनुमती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

या वर्षीही आषाढी एकादशीला पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद 

संभाजीनगर येथे उपाहारगृहांचे बनावट ‘पेज’ सिद्ध करून ‘ऑनलाईन’ फसवणूक

दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी (ऑर्डर) करणार्‍यांची संख्या वाढली आहे. अनेक व्यावसायिकांनी सामाजिक माध्यमांवर ‘पेज’ चालू केले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित !

उच्च न्यायालयाने राणा यांना ठोठावला २ लाख रुपयांचा दंड !
राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता !

पंतप्रधान सर्व प्रश्‍न सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषय मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती !

नागपूरसह देशात ४ ठिकाणी मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी होणार !  – आधुनिक वैद्य समीर पालतेवार

‘नागपूरसह पाटणा, देहली आणि भाग्यनगर (हैद्राबाद) या देशातील ४ ठिकाणी लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी देशातील २ ते १८ वयोगटांतील ५२५ मुलांची निवड करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद !

वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे प्रकरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद ! आरोग्य अधिकार्‍यांना शिवीगाळ करणारे काँग्रेसचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी ! वर्धा – येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात … Read more

परराज्यातील लोक महाराष्ट्रात लसीकरणासाठी येत असल्याचे उघड ! – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

कोविन अ‍ॅपद्वारे नोंदणी करून परराज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये लसीकरणासाठी येत असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दळणवळण बंदी त्वरित हटवली जाईल, अशी अपेक्षा करू नका ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

निर्बंध हळूहळू न्यून करण्याचे प्रयत्न होतील, असे माझे अनुमान आहे; पण पूर्ण दळणवळण बंदी काढून १०० टक्के मोकळीक होईल, असे होणार नाही. चर्चा होईल आणि मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. दळणवळण बंदी त्वरित हटवली जाईल, अशी अपेक्षा करू नका…

आरोग्य विभागातील १६ सहस्र पदे तातडीने भरणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य सुविधा हा महत्त्वाचा घटक झाला आहे; मात्र राज्यात अनेक ठिकाणी आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. अशा १६ सहस्र पदांची तातडीने भरती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ६ मे या दिवशी पत्रकारांना दिली.

स्थानांतर केल्यामुळेच परमबीर सिंह यांचे खोटेनाटे आरोप ! – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ४ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले मुंबई पोलीस आयुक्तपदावरून स्थानांतर केल्यामुळेच त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर चुका क्षमा करण्यालायक नव्हत्या. त्या अक्षम्य अशा चुका होत्या..