लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींनी घरी जाऊन दिला भारतरत्न पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या घरी जाऊन ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमित शहा उपस्थित होते.

प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला ‘भक्ती सोहळा’ !

इंदूरनिवासी थोर संत तथा सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ३१ मार्च या दिवशी येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘भक्ती सोहळा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला.

‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ लोकसभेची निवडणूक लढवणार !

गेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समितीने लाखापेक्षा अधिक मते मिळवल्याने समितीने मराठी भाषिकांची मते कायम रहावीत, यासाठी आगामी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

#Savarkar :राहुल गांधी यांनी सावरकर वाचले नाहीत, त्यामुळे त्यांना ते कळले नाहीत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राहुल गांधी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पहायला आले, तर मी त्यांच्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह त्यांच्यासाठी राखून ठेवीन आणि त्यांना एकट्याला हा चित्रपट पहाता यावा, अशी व्यवस्था करीन, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘आय.पी.एल्.’च्या एका सामन्याच्या झालेल्या वादातून क्रिकेटप्रेमीची हत्या !

‘आय.पी.एल्.’ (इंडियन प्रीमियर लीग) स्पर्धा निव्वळ व्यावसायिक हेतूने खेळवली जाते. यातून आस्थापने आणि त्यांनी विकत घेतलेले खेळाडू प्रचंड अर्थार्जन करतात. असे असतांना अशा भयावह घटनांतून जनतेची वैचारिक आणि भावनिक पातळी यांचा दर्जा किती खालावला आहे, हेच लक्षात येते !

प्रा. अब्दुल्ला मोल्ला यांच्यावर परीक्षेत उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोप !

संदेशखाली प्रकरणाविषयी बंगाल पोलिसांची भूमिका संपूर्ण जगाने पाहिली. त्यामुळे आता या प्रकरणीही तृणमूल काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली असली, तरी पुढे काहीच केले गेले नाही, तर आश्‍चर्य वाटू नये !

Election Freebies : शिधा म्हणून व्हिस्की आणि बिअर देणार ! – अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत

जनतेला काय द्यायला हवे, तेही न कळणारे उमेदवार !

आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर लागू होणार समान नागरी कायदा !

आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली.

श्री तुळजापूर देवस्थानाने मंडप आणि पिण्याचे पाणी उपलब्ध न केल्याने भाविकांची गैरसोय !  

ऐन उन्हाळ्यात मंदिर प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार !

नोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा झाला; पण पुढे आयकराच्या कारवाईचे काय झाले ? – नागरत्ना, न्यायमूर्ती

८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा दैनंदिन आवश्यकतांसाठी नोटा पालटून घ्याव्या लागणार्‍या कामगारांची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना करा ! यानंतर ९८ टक्के चलन परत आले, मग काळ्या पैशांचे उच्चाटन कुठे झाले ?