आपत्‍काळात भक्‍तांचे दुःख मी माझ्‍या पायाशी घेईन ! – श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्‍तांना भाकणुकीत आशीर्वचन

श्री क्षेत्र आप्‍पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्‍तांना भाकणुकीत आशीर्वचन !

श्री क्षेत्र आप्‍पाचीवाडी कुर्ली (जिल्‍हा बेळगाव) – देशात स्‍त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारील. भगवा झेंडा राज्‍य करील. आपत्‍काळात भक्‍तांचे दुःख मी माझ्‍या पायाशी घेईन. देवधान्‍य बहुत पिकेल, राजधान्‍य उदंड पिकेल, असे आशीर्वचन श्री क्षेत्र आप्‍पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाने भक्‍तांना भाकणुकीत दिले. याचसमवेत ऊसासाठी देशात आंदोलन होऊन खेडोपाडी दंगाधोपा होईल, जगात ‘अंडरवर्ल्‍ड डॉन’ची हत्‍या होऊन टोळीयुद्ध धुमसत राहील. कर्नाटक राज्‍यात मोठा गोंधळ माजेल. जाती-धर्म बिघडून जाईल. जाती-धर्मात वैरत्‍व वाढून हाणामार्‍या होतील, असेही सांगून देशात होणार्‍या अराजकतेविषयी सर्वांना सूचित केले आहे. ही भाकणूक २१ ऑक्‍टोबरच्‍या पहाटे ३.४५ वाजता पू. सिद्धार्थ (पू. भगवान डोणे महाराज यांचे चिरंजीव) डोणे महाराज (वाघापुरे) यांच्‍या माध्‍यमातून सांगण्‍यात आली.

श्री हालसिद्धनाथ देव

भाकणुकीतील ठळक भाकीते !

पू. सिद्धार्थ (पू. भगवान डोणे महाराज यांचे चिरंजीव) डोणे महाराज (वाघापुरे)
  • पाकिस्‍तानातील भारत देशाचा चौथा हिस्‍सा भारताच्‍या नियंत्रणात येईल
  • मुसलमान राष्‍ट्रे जगाच्‍या नकाशातून पुसून जातील
  • देशात भगवा झेंडा राज्‍य करील !
  • जाती-धर्मात वैरत्‍व वाढून हाणामार्‍या होतील
  • ‘अंडरवर्ल्‍ड डॉन’ची हत्‍या होऊन टोळीयुद्ध धुमसत राहील
  • कर्नाटक राज्‍यात मोठा गोंधळ माजेल

संपूर्ण भाकणूक वाचण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा

https://tinyurl.com/yeye29d4

https://tinyurl.com/8jyw5ykd

या भाकणुकीत म्‍हटले आहे

१. आप्‍पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रतिशिर्डी होईल. हालसिद्धनाथाच्‍या मंदिराच्‍या बांधकामाला ३३ कोटी देवांचा आशीर्वाद आहे.

२. दूध घालणारा कर्जात, तर डेरीचा मॅनेजर मलई खात राहील.

३. साखर सम्राटाची आसंदी डळमळीत राहील

४. चालता बोलता मनुष्‍याचा प्राण जाईल, मनुष्‍याच्‍या आजारापुढे डॉक्‍टर लोक हात टेकतील.

५. शेतीसाठी देशात खून पडतील, समुद्राची संपत्ती नाश पावेल.

६. मुसलमान राष्‍ट्रे जगाच्‍या नकाशातून पुसून जातील.