नवी देहली – येथील रोहिणी सेक्टर १४ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शाळेजवळ २० ऑक्टोबरला झालेल्या स्फोटाचे दायित्व खलिस्तानवादी आतंकवाद्यांनी स्वीकारले आहे. त्यांचा संदेश ‘जस्टिस लीग इंडिया’ या ‘टेलिग्राम गटा’वर आला आहे. यात त्यांनी ‘आम्ही कधीही आक्रमण करण्यास सक्षम आहोत’, असे नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकाखलिस्तानी आतंकवाद्यांचा हा दावा खरा आहे का ? कि जाणीवपूर्वक याचा लाभ उठवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, हे अन्वेषण यंत्रणा उघड करतीलच ! |