धनबाद (झारखंड) येथे प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदन अन् ‘ऑनलाईन’ बैठकीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे प्रबोधन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाने होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

‘मुरुगा’ देवतेला ‘तमिळ भाषेची देवता’ असे नाव देता येणार नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या अनेक देवता या शास्त्रे आणि कला यांच्या देवता आहेत. हिंदूंच्या धर्मशास्त्रात तसा उल्लेख आहे. त्यामुळे असा निर्णय देतांना न्यायालयाने हिंदूंचे सर्वोच्च गुरु शंकराचार्य यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

नक्षलग्रस्त भागातून पुरवठा होत असलेला साडेतीन कोटी रुपयांचा गांजा विक्रोळी (मुंबई) येथे जप्त, २ जणांना अटक

गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या वेब सिरीजवर सेन्सॉरशिप आणा ! – लोकसभेत भाजपच्या खासदारांची एकमुखी मागणी

भाजपच्या खासदारांनी वेब सिरीजवर सेन्सॉरशिप या मागणीचा कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !

जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्यात येईल ! – गृहमंत्री अमित शहा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत मांडण्यात आले. विधेयकावरील चर्चेवेळी विरोधी पक्षांनी यावर काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना शहा यांनी वरील घोषणा केली.

चीन अतिशय खुश आहे !

‘सध्याच्या स्थितीत सैन्य माघारी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आणि चीनला खुश करणारे आहे.-डॉ. स्वामी

टि्वटरच्या माध्यमातून गृहयुद्ध करण्याचा कट ! – कंगना राणावत

कंगना यांनी यापूर्वी टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

जर्मन बेकरी स्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानात

जगाच्या कोणत्याही देशात इतकी वर्षे अशी एखादी भीषण समस्या तशीच भिजत ठेवल्याची उदाहरणे विरळ असतील !

आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना जामीन

आय.सी.आय.सी.आय. अधिकोषाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर यांना सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयाने ५ लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन संमत केला आहे.

बिहारमध्ये कोरोना चाचणी घोटाळ्याच्या प्रकरणी ५ अधिकारी निलंबित

राज्यातील जमुईत सिकंदरा आणि बारहाट येथे तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला.