कॅनडाकडून भारतावर हत्येचा आरोप करत उच्चाधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश !

कॅनडामध्ये गेल्या काही दशकांपासून खलिस्तानी आतंकवाद्यांचे शीख समर्थक रहात असून ते पंजाबमधील खलिस्तान्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करत आहेत. पंजाबमध्ये कारवाया करून खलिस्तानी आतंकवादी कॅनडामध्ये पळून जातात, हे नवीन राहिलेले नाही.

सिवान (बिहार) येथे भाजपच्या प्रभाग अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने जात आहे, हेच अशा घटनांवरून लक्षात येते !

मणीपूरमध्ये सुटीवर असलेल्या सैनिकाची डोक्यात गोळी घालून हत्या !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सेर्टो थांगथांग कोम यांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.

देहलीत मुसलमान तरुणाच्या आक्रमणात एका हिंदु तरुणाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ !

हिंदूबहुल देशाच्या राजधानीतच हिंदू असुरक्षित आहेत, तेथे अन्य ठिकाणांची काय स्थिती असेल ? , हे लक्षात येते ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उडघत नाहीत !

फरीदाबाद (हरियाणा) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची धर्मांधांकडून हत्या, तर दुसरा घायाळ

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या अशा हत्या होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कारवाया करणार्‍या कुख्यात आतंकवाद्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता.

पंचनाम्‍यातील अनेक नोंदी पोलिसांनी सांगितल्‍यामुळे पंचांनी नमूद केल्‍या ! – अधिवक्‍ता अनिल रुईकर

घरझडतीत जप्‍त केलेली पुस्‍तके आणि पत्रके यांवर समीर गायकवाड यांचे नाव नाही, ‘एखाद्या गोष्‍टीचे प्रबोधन करणे’ म्‍हणजे आक्षेपार्ह आहे का ? समीर गायकवाड यांच्‍या ‘डायरी’त अनेक नावे आणि लिखाण असतांना केवळ एका विशिष्‍ट व्‍यक्‍तीचेच नाव पंच पटेल यांनी नमूद केले.

हवाईसुंदरीची हत्‍या करणार्‍या आरोपीची कारागृहात आत्‍महत्‍या !

हवाईसुंदरी रूपलच्‍या हत्‍या प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने अंधेरी परिसरातील कारागृहात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. विक्रमला या प्रकरणी ८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली होती.

आरोपी मनोज साने याच्‍यावर दोषारोपत्र प्रविष्‍ट

मीरा रोड येथील मनोज साने आणि मृत सरस्‍वती वैद्य हे दोघे ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’मध्‍ये रहात होते. त्‍यांच्‍यात भांडण झाल्‍याने आरोपी साने याने सरस्‍वती वैद्य हिची ८ जूनला विष देऊन हत्‍या केली होती.

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

इंग्लंडने वाघनखे भारताला देण्याची सिद्धता दर्शवली आहे. वाघनखे लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’त ठेवण्यात आली आहेत.