Harsh Raj Murder : विद्यार्थी नेते हर्ष राज यांच्या हत्येच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांकडून आंदोलन !

हत्या करण्यात आलेले विद्यार्थी नेते हर्ष राज

पाटलीपुत्र (बिहार) –  येथील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी नेते हर्ष राज यांची महाविद्यालयात अमानुष मारहाण करून नुकतीच हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पाटलीपुत्र येथील अशोक राजपथ अडवून विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू केले. आंदोलक विद्यार्थ्यांनी रस्त्यावर जाळपोळ चालू केली. ते हर्ष राज यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. याविषयी माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला.

रस्ता अडवून आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त विद्यार्थी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गोंधळ घालणार्‍या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.