22 Murder Accused Arrested : श्रीराममंदिरात दर्शनासाठी आलेल्या २२ हत्या करणार्‍या आरोपीला अटक

२२ हत्या होईपर्यंत आरोपीला अटक करून शिक्षा देऊ न शकणारे पोलीस काय कामाचे ?

अयोध्या (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश पोलिसांनी येथे श्रीराममंदिरात दर्शनासाठी आलेला किशोर तिवारी उपाख्य किस्सू तिवारी याला अटक केली आहे. त्याच्यावर २२ हत्या केल्याचा आरोप आहे.

मध्यप्रदेशातील कटनी येथून तो पसार झाला होता. त्याच्याविषयी माहिती देणार्‍याला ५५ सहस्र रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. तो साधूचा वेश परिधान करून श्रीराममंदिरात दर्शनासाठी आला होता. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून तिवारी श्रीराममंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.