Pakistan In UN : नवीन भारत इतरांच्या घरात घुसून त्यांना मारत आहे ! – पाकचे राजदूत मुनीर अक्रम

संयुक्त राष्ट्रांत पाकचे राजदूत मुनीर अक्रम यांचे विधान !

पाकचे राजदूत मुनीर अक्रम

न्यूयॉर्क (अमेरिका) – नवा भारत धोकादायक आहे, तो तुम्हाला सुरक्षित ठेवत नाही, तर असुरक्षित करतो. नवीन भारत इतरांच्या घरात घुसून तुम्हाला मारत आहे, असे विधान पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केले. पाक आणि अन्य देशांत भारतविरोधी आतंकवाद्यांच्या होत असलेल्या हत्यांवरून अक्रम यांनी हे विधान केले आहे. अक्रम यांनी अमेरिकी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला देत वरील विधान केले.

(म्हणे) ‘भारताने पाकिस्तानमध्ये लक्ष्यित हत्या (टार्गेट किलिंग) घडवून आणल्या !’

मुनीर अक्रम म्हणाले की, कॅनडातील खलिस्तानी हरदीपसिंह निज्जर याच्या व्यतिरिक्त भारत सरकारने परदेशी भूमीवर रहाणार्‍या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या लक्ष्यित हत्यांच्या (‘टार्गेट किलिंग्ज’च्या) घटना घडवून आणल्या आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषद, सरचिटणीस आणि सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधील ‘टार्गेट किलिंग‍’च्या घटनांविषयी भारताच्या मोहिमेची माहिती दिली आहे; मात्र हे केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित नाही. यामध्ये कॅनडातील राजकीय विरोधकांच्या हत्यांचाही समावेश आहे. इतर देशांमध्येही हा प्रयत्न केला गेला आहे.

(म्हणे) ‘पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत !’

अक्रम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. मोदी म्हणाले होते, ‘हे लोक (भारतातील विरोधी पक्षाचे नेते) इतके घाबरले आहेत की, त्यांना स्वप्नातही पाकिस्तानचे अणूबाँब दिसतात. असे सरकार आणि नेते देश चालवू शकतात का ?’ यावर प्रत्युत्तर देतांना अक्रम यांनी ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत’, असे म्हटले. (काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनीसुद्धा हेच विधान केले होते. पाकिस्तानची भाषा बोलणार्‍या अशा नेत्यांना पाकिस्तानातच पाठवले पाहिजे ! – संपादक)

ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने एका वृत्तात दावा केला होता की, भारत सरकारने परदेशी भूमीवर रहाणार्‍या आतंकवाद्यांना ठार करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमध्ये हत्या केल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारत असे काही करत आहे, याचा अद्याप एकही पुरावा कोणत्याही देशाने दिलेला नाही. उलट पाकिस्तान गेली ३५ वर्षे भारतात जिहादी आतंकवादी कारवाया घडवून आणत आहे आणि त्यात सहस्रो लोकांचा मृत्यू झाला आहे. याविषयी भारताने जगाला सांगितले पाहिजे !
  • भारताला असे करायचेच असते, तर त्याने छोट्या-मोठ्या आतंकवाद्यांना ठार करत बसण्यापेक्षा दाऊद इब्राहिम, हाफीज सईद, झकीउर रहमान लखवी यांसारख्या आतंकवाद्यांच्या नेत्यांनाच ठार केले नसते का ?