प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय सांगणार्‍या समितीचा दीड वर्षे अहवालच नाही !

महापालिका मूर्तीकारांवरील गुन्हे मागे घेणार का ? गुन्हे मागे न घेतल्यामुळे मूर्तीकारांचे खच्चीकरण होणार आणि भक्तांचीही गैरसोय होणार ! त्यांच्यासाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. 

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : चारचाकीने महिलेला उडवले !; आरोपीला जामीन संमत !…

मालाडमध्ये पुन्हा एकदा एका आलीशान चारचाकीने एका निष्पाप २७ वर्षीय महिलेचा जीव घेतला आहे. चालकाने महिलेला धडक दिली आणि मग तिला दुभाजकापर्यंत फरफटत नेले.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांकडून बेमुदत संप चालू !

हिंदूंच्या ऐन सणाच्या वेळी केल्या जाणार्‍या संपामुळे हिंदूंना धर्मपालनास अडथळे येणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

Kirtankar H.B.P. Charudatta Aphale : राष्‍ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्‍या ‘आयआयटी मुंबई’ येथील कार्यक्रमाला विरोध !

महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्‍था यांमध्‍ये शहरी नक्षलवाद बोकाळत आहे, याचे हे उदाहरण होय. राष्‍ट्र आणि हिंदु धर्म यांच्‍या विरोधात सातत्‍याने कार्य करणार्‍या अशांचा वैचारिक प्रतिवाद करणे आवश्‍यक !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक !; लालबाग अपघात प्रकरणातील आरोपी अटकेत !…

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ४ आस्थापने, संचालक आणि दलाल अशा २५ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

PIL Against IC-814 Webseries : हिंदु सेनेची वेबसिरीजवर बंदी आणण्‍यासाठी देहली उच्‍च न्‍यायालयात याचिका !

विमान अपहरण करणार्‍या इस्‍लामी आतंकवाद्यांची नावे ‘भोला’ आणि ‘शंकर’ अशी ठेवण्‍यात आल्‍याचे ‘हिंदु सेना’ या संघटनेने प्रविष्‍ट केलेल्‍या या याचिकेत म्‍हटले आहे.

लालबाग (मुंबई) येथे मद्यपीने चालकावर केलेल्या आक्रमणामुळे बसची ९ जणांना धडक;  एकाचा मृत्यू

बसमधील एका मद्यपीचे चालकासमवेत भांडण झाले. त्याने हमरीतुमरीवर येऊन चालकाच्या खांद्यावर हात टाकत बसच्या स्टेअरिंगचा ताबा मिळवण्याचा आणि चालकाला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

मुंबईतील मॉलमधील कॉफीत झुरळ सापडले !

पोलिसांनी उपाहारगृह व्यवस्थापक, वेटर (वाढपी) आणि इतर संबंधित यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘अशा कॉफीमुळे आपल्याला अपचन, विषबाधा किंवा इतर काही त्रास झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ?’ असा प्रश्न प्रदीप रावत यांनी विचारला.

चुकीचा इतिहास शिकवला, याविषयी काँग्रेस क्षमा मागणार का ? – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान केला नाही. पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणांमध्ये कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेखही केला नाही.

‘आयटीआय’मधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण देणार !

‘हर घर दुर्गा’ या अभियानाच्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे. शारीरिक प्रशिक्षणाच्या तासिकेप्रमाणे विद्यार्थिनींसाठी आत्मरक्षण प्रशिक्षणाची राखीव तासिका चालू करण्यात येणार आहे.