महाराष्ट्रात राबवले जात आहे ७ वर्षांपूर्वीचे क्रीडा धोरण !

महाराष्ट्रात मात्र २०१२-२०१७ या पंचवार्षिक क्रीडा धोरणानंतर नवीन क्रीडा धोरण निश्चितच करण्यात आलेले नाही. या जुन्या धोरणावरच क्रीडा धोरणाचा कारभार चालू आहे. यातून राज्याची क्रीडाक्षेत्राविषयीची अनास्था दिसून येत आहे.

कामकाजाची माहिती संकेतस्थळावर न ठेवणार्‍या जनमाहिती अधिकार्‍यांच्या विरोधात राज्य माहिती आयोग करणार दंडात्मक कारवाई !

राज्यातील अनेक सार्वजनिक प्राधिकरणे स्वत:ची माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्राधिकरणांच्या जनमाहिती अधिकार्‍यांवर राज्य माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात भावपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन !

अनेक ठिकाणी ढोल-ताशा पथकांच्या निनादातून झालेली नव्या तालाची ‘आवर्तने’, बँडपथकातील कलाकारांनी वाजवलेल्या भक्तिगीताच्या मधूर सुरावटी, नगारावादनासह सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर, ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष, पारंपरिक पेहरावातील कार्यकर्त्यांचा उत्साह अवर्णनीय होता.

ठाकरे, पवार शेवटची निवडणूक – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ते हेच बोलले होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळून ३ ठार !; आता बदलापूर ते पनवेल १० मिनिटांत !…

दिंडोशीमधील बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या २० व्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर काही कामगार गंभीर घायाळ झाले आहेत.

राज्यातील ३६ सहस्र ९७८ अंगणवाडीमध्ये सौर ऊर्जा देण्यात येणार !

राज्यशासनाच्या स्वमालकीच्या आणि विजेची सुविधा नसलेल्या ३६ सहस्र ९७८ अंगणवाड्यांना सौर ऊर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय ५ सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

एस्.टी. कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ ! – मुख्यमंत्री

राज्य परिवहन महामंडळातील (एस्.टी.) कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनामध्ये एप्रिल २०२० पासून ६ सहस्र ५०० रुपयांची वाढ करण्यात येईल, हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन !

महाराष्ट्रात शक्ती कायदा लागू करण्यात यावा, यासाठी ३ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंत्रालयाजवळील गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.

एस्.टी.च्या संपामुळे सुमारे १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला !

४ सप्टेंबरलाही राज्यभर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोकणातील बसगाड्यांची वाहतूक रखडल्याने प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत आहेत. संपामुळे एस्.टी.चा १५ कोटी रुपयांचा महसूल बुडला आहे.

पुणे जर्मन बेकरीतील आरोपी हिमायत बेग याला पॅरोल नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले !

पुणे येथील जर्मन बेकरी बाँबस्फोटाशी संबंधित खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एकमेव दोषसिद्ध आरोपी हिमायत बेग याला नाशिक कारागृह प्रशासनाने पॅरोल नाकारला.