दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक !; लालबाग अपघात प्रकरणातील आरोपी अटकेत !…

 

२१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटींची फसवणूक !

मुंबई – गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून २१४ गुंतवणूकदारांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ४ आस्थापने, संचालक आणि दलाल अशा २५ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधितांनी वर्ष २०२२ पासून आतापर्यंत गुंतवणूक करण्यास भाग पाडले आहे आणि रकमेचा अपहार केला आहे.


लालबाग अपघात प्रकरणातील आरोपी अटकेत !

मुंबई – लालबाग या ठिकाणी झालेल्या अपघातात नुपूर मणियार या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणासाठी उत्तरदायी असलेल्या दत्ता शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. दत्ता शिंदेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


वयोवृद्ध नेत्याला धमकावत मागितली खंडणी

सोलापूर – बार्शी तालुक्यातील एका वयोवृद्ध नेत्याला धमकावत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. नेत्याच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार एका महिलेसह ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यात एका उद्योजकाचाही समावेश आहे.

संपादकीय भूमिका : असुरक्षित सोलापूर !


रायगडात पावसाने सरासरी ओलांडली !

अलीबाग – रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३ सहस्र २९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत १०६ टक्के आहे. जिल्ह्यात पुढील ५ दिवसांत मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.