राज्यातील शाळेच्या बसगाड्यांना ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली बसवणे बंधनकारक !

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसगाड्यांमध्ये ‘जी.पी.आर्.एस्.’ बसवण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोदार शाळेतील बस सायंकाळी उशिरापर्यंत पोचली नव्हती.

नवी मुंबई येथे रस्त्याच्या कामासाठी २ सहस्र ५०० झाडे तोडण्याचा डाव !

पर्यावरणमंत्र्यांनी यात लक्ष घालून होणारी वृक्षतोड थांबवावी, ही अपेक्षा !

साकीनाका (मुंबई) येथील बलात्कारप्रकरणी मोहन चौहान न्यायालयाकडून दोषी !

साकीनाका येथील ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवले आहे.

हिंदूंची बळकावलेली सर्व मंदिरे परत मिळवण्यासाठी सरकारने केंद्रीय कायदा करायला हवा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास अभ्यासक

‘कुतूबमिनार हे हिंदू आणि जैन यांची २७ मंदिरे पाडून बनवण्यात आले आहे’, असे भारतीय पुरातत्व विभागाने स्वत: प्रकाशित केलेल्या पुस्तकात म्हटलेले आहे; मात्र या पुस्तकातील तथ्याच्या विरोधातील भूमिका त्यांनी न्यायालयात घेतली आहे. या विरोधात आवाज उठवला पाहिजे.

मुंबई साखळी बाँबस्फोटातील आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

आरोपी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने या चौघांची अटक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या २९ वर्षांपासून गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग या आरोपींचा शोध घेत होते.

मुंबई येथे इमारतींच्या दुरुस्तीची कामे करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

अपघात झाल्याने कामगारांचा मृत्यू झाल्याचे किंवा अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या आहेत

दादर स्थानकातील रेल्वेरुळांवर नियमित फेकल्या जातात प्लास्टिकच्या शेकडो बाटल्या !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

भ्रष्टाचाऱ्यांना अटक न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करू ! – हिंदु जनजागृती समिती

अहवालानुसार दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा घोटाळा झाला असून, त्यात लिलाव करणारे (लिलावदार) ९ जण, ५ तहसीलदार, १ लेखापरीक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर दोषी म्हणून ठपका ठेवण्यात आला आहे. यांसह त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय !

शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. छत्रपती संभाजीराजे, तुम्ही नामी संधी घालवली ! – अरविंद सावंत

‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील अमली पदार्थांच्या पार्टी प्रकरणी १४ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट !

पुराव्यांअभावी आर्यन खान याच्यासह ६ जणांविरोधात आरोप नसल्याचे प्रतिपादन ! आता समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करणार का ? – नवाब मलिक