कोकण रेल्वेच्या गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांचे आरक्षण पूर्ण !

कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा सूची अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेच बंद केले आहे.

सांगलीसाठी नवीन भव्य महापालिका इमारत, तसेच कृषी भवन होणार !

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने निर्णय

‘सारथी संस्थे’ला भूखंड देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत !

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) नवी मुंबई येथील केंद्रासाठी भूखंड देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

शिवसेनेचे संजय राऊत आणि संजय पवार यांच्याकडून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट !

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा अंगरक्षक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता !

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या चौकशीत माहिती आली समोर

(म्हणे) ‘वाराणसीमधील मंदिर जेवढे जुने तेवढीच ज्ञानवापी मशीदही जुनी !’

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. भविष्यात न्यायालयातही हे सिद्ध होईल; तरीही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणारे हे सत्य पवार का नाकारत आहेत, हे हिंदू जाणून आहेत !

मुंबईमध्ये दुचाकीवरील दोघांनीही शिरस्त्राण घालणे बंधनकारक !

मोटार वाहन नियमानुसार दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती यांना शिरस्त्राण वापरणे बंधनकारक आहे. मुंबईमध्ये या नियमाची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. सध्या याविषयी पोलीस जनजागृती करत असून प्रत्यक्ष कारवाई १५ दिवसांनी चालू करण्यात येणार आहे.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

शिवसेना नेते यशंवत जाधव यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावला आहे. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी त्यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये जाधव यांच्या विदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

‘मंकीपॉक्स’विषयी मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृतीस प्रारंभ !

‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू केली आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून येणार्‍या प्रवाशांची पडताळणी केली जात आहे. ‘मंकीपॉक्स’ हा विषाणूजन्य झुनोटिक रोग असून तो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटीबंधीय भागात आढळतो.

गुंड दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचे उघड !

दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याने ही माहिती चौकशीच्या वेळी दिली.