|
संभाजीनगर – येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने खासगी ट्रॅव्हल्स आस्थापनांसाठी अडीच ते तीनपट तिकिटांचे दर ठेवण्यास अनुमती दिली आहे. तसे शुल्कवाढ पत्रकच (‘टॅरिफ चार्ट’च) त्यांनी घोषित केले आहे.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संभाजीनगरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता विभागातील एक दूरध्वनी बंद होता, तर एक दूरध्वनी उचलण्यात आला नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.
प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिद्धीपत्रकातील दीडपटीचा उल्लेखच काढून टाकला !
प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिवर्षी एस्.टी महामंडळाला दिवाळीच्या १० दिवसांत १० टक्के, तर खासगी बसना दीडपट भाडे आकारण्याची अनुमती दिली जात होती; मात्र या वर्षी २० ऑक्टोबर या दिवशी संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी लागू केलेल्या प्रसिद्धीपत्रकात चक्क दीडपटीचा उल्लेखच काढून टाकण्यात आला आणि उलट १० मार्गांवर अडीच ते तिप्पट दर असलेला तक्ता देण्यात आला. त्यामुळे संभाजीनगर येथील खासगी बसचालकांनी दीडपटीपेक्षा अधिक शुल्कवाढ केली आहे.
(म्हणे) ‘यापेक्षा अधिक भाडे आकारले, तर तक्रार करा !’
ट्रॅव्हल्स मालकांनी त्यांना ठरवून दिलेल्या शुल्कवाढीपेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई करण्यात येईल. या तक्रारी [email protected] या संकेतस्थळावर नोंद करण्यात याव्या. समवेत तिकिटाची प्रत जोडावी, अशी माहिती संजय मैत्रेवार यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी दिली.
संभाजीनगर येथून विविध गावांना जाण्यासाठी ट्रॅव्हल्ससाठी ठरवून दिलेली शुल्कवाढ अशी…
मुंबई – १ सहस्र ८०० रुपये (ऐरव्हीचा दर ६०० ते ८०० रुपये म्हणजे तिप्पट रकमेपर्यंत दर आकारता येणार.)
नागपूर – २ सहस्र ४०० रुपये (एरव्हीचा दर १ सहस्र २०० रुपये म्हणजे दुप्पट दर आकारता येणार.)
चंद्रपूर – २ सहस्र ९०० रुपये
सोलापूर – १ सहस्र ५०० रुपये
लातूर – १ सहस्र ३०० रुपये
पुणे – १ सहस्र २०० रुपये
कोल्हापूर – २ सहस्र २०० रुपये
सांगली – २ सहस्र २०० रुपये
यवतमाळ – १ सहस्र ७०० रुपये
हिंगोली – १ सहस्र १०० रुपये
संपादकीय भूमिका
|