वानवडी (पुणे) येथे भरदिवसा पेढीवर दरोडा !

गुन्हेगार भरदिवसा दरोडा टाकतात म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! अशी पोलीसयंत्रणा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कशी सुधारणार ?

सिल्लोड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे गर्भपात करणार्‍या आधुनिक वैद्यांसह ४ जणांना अटक !

अवैध गर्भपात केल्यानंतर मृत अर्भकांची नाल्यात विल्हेवाट लावली जाणे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचे आणि म्हणूनच संतापजनक !

Tuljabhavanidevi Temple Donation Scam : न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे न नोंदवल्यास प्रशासनाविरुद्ध अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – हिंदूंची चेतावणी

. . . अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या आहेत.’’ याउपरही प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केला, तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अवमान याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणीही अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांनी दिली.

फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण सादर करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

जनतेच्या कल्याणासाठीचे निर्णय घेऊन प्रशासन त्वरित कामे करण्यासाठी कुणाचा तरी जीव जाण्याची वाट पहात आहे का ? असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

परळ येथील दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामले कलाकारांसह उपोषण करणार !

नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेचा प्रस्ताव

नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकार्‍याला ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात लाचखोरीचा शिरकाव होणे निंदनीय ! अशा लाचखोरांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

छत्रपती संभाजीनगर येथील मकबर्‍याच्या ८४ एकरच्या भूमीची वादग्रस्त मोजणी रहित !

मकबर्‍याची भूमी परस्पर ८४ एकर करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

यवतमाळ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत दिलेल्या चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्या !

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे नोंद होणार !

अनधिकृत शाळा चालूच होऊ नयेत यासाठी उपाययोजना होणे आवश्यक !

प्रचंड गर्दीमुळे गंगोत्री आणि यमुनोत्री येथील व्यवस्थापन ढेपाळले !

चारधाम यात्रेला प्रारंभ होऊन काही दिवस झाले आहेत. चारधाम पैकी बद्रीनाथ आणि केदारनाथ येथील स्थिती नियंत्रणात असली, तरी गंगोत्री अन् यमुनोत्री येथे भाविकांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे.