यवतमाळ – पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारात चॉकलेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत विद्यार्थिनींना चॉकलेट देण्यात आले; पण त्यात अळ्या निघाल्या. (विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या चॉकलेटच्या दर्जाची पडताळणी कोण करते, याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक) पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांनी चॉकलेटचे वाटप करणे थांबवले आहे.
९५ पैकी ६३ पालकांना चॉकलेटची पाकिटे वाटण्यात आली. त्यातील एका चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्या. त्यानंतर सर्वच पालकांनी चॉकलेट मुख्याध्यापकांकडे परत केली.
यवतमाळ शहरातील काही शाळंतील विद्यार्थ्यांनी चव नसल्याने चॉकलेट फेकून दिल्याचेही समजते.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ करणार्या संबंधितांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |