नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेचा प्रस्ताव
नाट्यगृह १०० वर्षे जुने !
मुंबई – मुंबईतील १०० वर्षांचा इतिहास असलेले परळ येथे ‘सोशल सर्व्हिस लीग’चे दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अभिनेते-निर्माते आणि ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाची चेतावणी दिली.
१. दामोदर नाट्यगृह १ नोव्हेंबर २०२३ पासून पुनर्बांधणीच्या कामामुळे बंद आहे. या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे.
२. विधीमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे पडसाद उमटले. त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली; मात्र मे २०२४ पासून ‘लीग’ने तोडकाम चालू केले. याचा नाट्य परिषदेने तीव्र निषेध केला आहे.
३. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले, ‘‘हा विषय सामोपचाराने सुटेल, अशी अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. याविरोधात आम्ही लीगला पत्र लिहू. तरीही त्यांनी ऐकले नाही, तर नाट्यगृह बचावासाठी कलाकारांना घेऊन मी रस्त्यावर उतरीन.’’
मुंबईतील सर्वांत जुने नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. कामगार वर्गातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘लीग’ने वर्ष १९९२ मध्ये नाट्यगृहाची उभारणी केली. मराठी कलाकारांनी या नाट्यगृहात त्यांची कला सादर केली आहे.