पुणे – मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद आणि सर्व नगरपालिका, तसेच पुणे, देहू आणि खडकी कॅन्टॉन्मेंट बोर्डाकडून विज्ञापन फलकांसंदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मागवला आहे. विज्ञापन फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. अन्वेषणानंतर अवैध फलक काढण्याची कारवाई करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश राज्यशासनाने दिले आहेत.
१. अनुमती दिलेल्या सर्व विज्ञापन फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण नव्याने करून घेण्यास संबंधित विज्ञापन फलकधारकाला कळवावे आणि त्यांनी लेखापरीक्षण केल्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्यास सांगावे.
२. लेखापरीक्षण न केलेले सर्व विज्ञापन फलक काढून टाकावेत, तसेच अनधिकृत विज्ञापन फलकांवरही कठोर कारवाई करावी.
३. धोकादायक, तसेच वाहतुकीस अडथळा ठरणार्या विज्ञापन फलकांवर तातडीने कारवाई करावी आणि कामकाजावर नियंत्रण ठेवून अधिकार्यांनी स्थापत्य विषयक लेखापरीक्षण केल्याचा प्रमाणित दाखला सादर करावा.
४. दाखला सादर न केल्यास किंवा लेखापरीक्षण न केलेल्या विज्ञापन फलकांना देण्यात आलेली नोटीस, संबंधितांवर करण्यात आलेली कारवाई या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सादर करावा, असे आदेशात सांगितले आहे.
संपादकीय भूमिका :
|