मंत्री शंभूराज देसाई यांच्‍या तालुक्‍यातच कृषी विभागातील ५० टक्‍के पदे रिक्‍त !

एकीकडे तरुणवर्ग नोकरीसाठी वणवण फिरतो आहे, तर दुसरीकडे पदे रिक्‍त रहात आहेत, हे अनाकलीन आणि गंभीर आहे. पदे रिक्‍त राहिल्‍यामुळे कामकाजावर होणार्‍या परिणामाचे दायित्‍व कुणाचे ?

न्‍यायव्‍यवस्‍थेचा वेळ वाया घालवणे, हे थांबवणे आवश्यक !

धनाढ्य आणि वलयांकीत लोक पैशाच्‍या जोरावर न्‍यायसंस्‍थेत अनेक वर्षे याचिका करून त्‍यांच्‍या विरुद्ध असलेल्‍या आरोपांना आव्‍हान देतात. या प्रक्रियेत बराच वेळ जातो. हिंदु राष्‍ट्रामध्‍ये अशी वेळ काढणारी न्‍यायव्‍यवस्‍था असणार नाही.’

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे शुद्धीकरण न करता सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. दूषित पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अन्वेषणाचा निर्णय घ्यावा ! – वीजमंत्री ढवळीकर, गोवा

वीज खात्यात वर्ष २०१६ मध्ये राबवलेला १४५ कोटी रुपये खर्चाचा ‘एरियल बंच केबलिंग’ हा प्रकल्प निरुपयोगी ठरलेला आहे. या प्रकल्पाचे अन्वेषण करण्यास मी सिद्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी निर्णय घ्यावा.

तिवरे धरण क्षेत्रातील ३० कुटुंबियांचे पुनर्वसन न होण्यामागील अडचणी दूर करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिवरे धरणाचा विषय गंभीर आहे. आम्हाला मोठ्या धरणांची आवश्यकता नसून छोटे-छोटे पाझर तलाव व्हावेत, अशी आमची मागणी आहे. तिवरे धरण फुटून चार वर्षे लोटली, तरी धरण नव्याने बांधण्याला संमती मिळालेली नाही.

पुणे येथे पोलिसांच्या ५ सहस्र सदनिकांचे काम १५ वर्षे रखडले, पैशाच्या अपहाराप्रकरणी होणार अन्वेषण !

काम असेल चालू राहिले, तर हे काम काही वर्षांत पूर्ण होईल, असे वाटत नाही. या प्रकरणात पोलिसांच्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामध्ये पोलिसांचे पैसे अडकले आहेत.

सिंधुदुर्ग : तात्पुरते स्थानांतर केलेली शिक्षिका एक मासानंतरही मूळ शाळेत आली नाही !

प्रशासनाचा भोंगळ कारभार ! वेळ मारून नेणारी उपाययोजना केल्याने एक समस्या सोडवतांना दुसर्‍या समस्या निर्माण ! 

सिंधुदुर्ग : वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वीजदेयके भरणार नाही !

गावात वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी नादुरुस्त असल्याचे कारण महावितरणकडून दिले जाते; मात्र पावसाळ्यापूर्वी वीजवाहिनीवर आलेली झाडे, झुडपे कापली गेली नाहीत. त्यामुळे विजेची समस्या उद्भवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गोवा : पोर्तुगिजांच्या विरोधात लढलेल्या नौदल सैनिकाला ५२ वर्षांनंतर मिळाला न्याय !

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अपंगत्व निवृत्तीवेतन देण्यात आले होते; परंतु वर्ष १९७१ मध्ये जालंधर सेना रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांचे अपंगत्व २० टक्क्यांहून अल्प असल्याचे सांगत त्यांचे अपंगत्व निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते.

‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्‍या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?

सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो.