राज्यातील २० सहस्रांहून अधिक परिचारिकांचे कामबंद आंदोलन !

परिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी ५ विद्यार्थ्यांना निलंबित करणार ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

अंडाशयावरील गाठ ! घाबरुन न जाता समजून घ्या !

गाठ म्हटल्यावर ‘कर्करोग’ हा एकच विचार रुग्णांच्या मनात येतो आणि उगाचच घाबरगुंडी उडते. पाळी चालू झाल्यापासून ते थांबेपर्यंत कोणत्याही वयात अशा साध्या गाठी अंडाशयावर येऊ शकतात. तसेच त्या कर्करोगाच्या असण्याची शक्यता फारच अल्प असते. या गाठी ‘हॉर्मोन्स’च्या (संप्रेरकाच्या) असंतुलनामुळे होतात.

पुणे येथे अटक केलेल्या दलालांनी आणखी दोघांना मूत्रपिंड दिल्याचे उघड !

मूत्रपिंडाच्या व्यापाराचे हे गंभीर प्रकरण असून पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

‘आय.एम्.ए.’ने रुग्णांची लूट थांबवावी !

खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा, यासाठी राज्य सरकारने कोविडकाळात उपचारांचे दर निश्चित केले आणि सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचे पालन बंधनकारक केले; मात्र असे असूनही काही रुग्णालयांनी रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केले. अशा तक्रारी केल्यानंतरही सरकारने त्यांच्यावर अंकुश लावायला हवा होता.

चंद्रपूर येथील सी.एच्.एल्. रुग्णालयावरील निलंबनाची कारवाई महापालिकेडून मागे !

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांची अनुमती रहित करत नियमित सराव चालू करण्याच्या सूचना दिल्या होत्या

‘गोवा मेडिकल कौन्सिल’मध्ये अपप्रकार आणि सरकारचा हस्तक्षेप !

‘गोवा मेडिकल कौन्सिल’ सध्या अटी आणि नियम यांच्याप्रमाणे कार्य करत नाही. परिषदेतील अपप्रकारांमध्ये वाढ झाली आहे तसेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या; परंतु अनुभव नसलेल्या आधुनिक वैद्यांची प्रमाणपत्राविना नोंदणी केली जात आहे.

राज्यात कोरोनामुळे दगावलेल्या २१० पैकी केवळ २७ आधुनिक वैद्यांना साहाय्य !

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नोंदींनुसार ९९ खासगी आधुनिक वैद्यांचा मृत्यू !