संभाजीनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी बनावट रुग्ण, ६ जणांवर गुन्हा नोंद ! 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ऐवजी दुसरेच बनावट रुग्ण उपचारासाठी भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार येथील महापालिका रुग्णालयात घडला आहे. महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर ६ जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

मराठवाडा येथील ‘३०-३०’ नावाच्या ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा नोंद !

मराठवाडा येथे सर्वांत मोठा घोटाळा समजल्या जाणार्‍या ‘३०-३०’ घोटाळ्या प्रकरणी पहिला गुन्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिडकीन पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष उपाख्य सुनील राठोड याच्या विरोधात पोलिसांनी नोंद केला आहे.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील अल्पवयीन पीडितेवर २ पोलिसांसह शेकडो जणांकडून अत्याचार !

असुरक्षित अल्पवयीन मुली आणि महिला ! ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील महिलांची दुर्दैवी स्थिती ! पोलीसच असे करत असतील, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा त्वरित होणे आवश्यक आहे.

पणजी शहरात ठिकठिकाणी नरकासुर प्रतिमांचे सांगाडे अजूनही पडून

महापालिकेसाठी हे लज्जास्पद ! नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्‍यांना सांगाडे काढावेत एवढेही भान का नाही ? यावरून समाजाची नीतीमत्ता दिसून येते.

कीर्तन आणि कीर्तनकार !

अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले. त्यांचा आदर्श घेऊन कीर्तनकारांनी स्वतःच्या मुख्य उद्देशापासून विचलित न होता कीर्तनसेवा द्यावी, हीच वारकर्‍यांची अपेक्षा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या दिवाळीनिमित्तच्या कार्यक्रमात कलाकार सपना चौधरीचा नाच !

नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून नाचाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे नेते कधीतरी जनहित साधू शकतील का ?

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून प्रतिदिन कोरोनाविषयी दिला जाणारा अहवाल बोगस !

प्रशासनाकडून प्रतिदिन कोरोना चाचणी केल्याचा दिला जाणारा अहवाल बोगस आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

धन आणि सुखसोयी यांसाठी हपापलेले भ्रष्टाचारी पत्रकार !

‘देशातील जनतेला चुकीची दिशा दिल्याने होणार्‍या हानीमुळे हे पत्रकार समष्टी पापाचे धनी होत आहेत’, हे त्यांना कळले, तरी ‘त्यांना ‘हिंदु धर्म’ कळला’, असे म्हणू शकतो; अन्यथा नावाचे ‘हिंदुत्ववादी’ आणि कर्माने ‘अधर्मी’ ठरले, तर ते पापाचे धनी होणार हे निश्‍चित !’

नरकासुर प्रतिमांच्या प्रदर्शनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण

ध्वनीप्रदूषण होत असल्याचे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? कुणाच्या तक्रारीसाठी का थांबावे लागते ? प्रशासनाची ही निष्क्रीयताच नव्हे, तर असंवेदनशीलता आहे !

नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्‍यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य !

गोवा राज्य आर्थिक संकटात असतांना नरकासुराच्या प्रतिमांवर पैसा खर्च करणे; म्हणजे नरकासुराच्या प्रतिमेसमवेत तो पैसा जाळल्याप्रमाणेच आहे !