पणजी शहरात ठिकठिकाणी नरकासुर प्रतिमांचे सांगाडे अजूनही पडून

१२ दिवस उलटूनही महापालिकेचे याकडे दुर्लक्ष

महापालिकेसाठी हे लज्जास्पद ! नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्‍यांना सांगाडे काढावेत एवढेही भान का नाही ? यावरून समाजाची नीतीमत्ता दिसून येते.

नरकासुराच्या प्रतिमांचे सांगाडे

पणजी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – ताळगाव आणि सांतइनेज परिसरांत नरक चतुर्दशीच्या १२ दिवसानंतरही नरकासुराच्या प्रतिमांचे सांगाडे किंवा अर्धवट जळलेले भाग रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहेत. प्रशासनाने येथील साफसफाईकडे दुर्लक्ष केले आहे. या सांगाड्यांमुळे येथील परिसराचे विद्रूपीकरण झालेले आहे. राज्यात येणार्‍या पर्यटकांसमोरही यामुळे गोव्याची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे. या परिसरात स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.