राज्याला १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट
कोरोनाच्या संकटासह राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वित्तीय स्थितीविषयी सादरीकरण करतांना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिली.