मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोणावळा (पुणे) येथील इतर भाषिक पाट्या हटवल्या !

येथील मराठी पाट्या नसणार्‍या दुकानांवर ४ डिसेंबर या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा नेला आणि इतर भाषिक पाट्या काढून टाकल्या. सर्वोच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत संपल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.

मीरा-भाईंदर येथील दुकानांवरील अमराठी नामफलकांना मनसेने काळे फासले !

मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत, मनसेचे मीरा-भाईंदर विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि महिला विधानसभा अध्यक्षा निता घरत यांसह अन्य कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

मराठी पाट्यांसाठी ५५ सहस्र १६ दुकानदारांना नोटिसा !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलकासमवेत मराठी नामफलक लावण्यासाठी महापालिकेने शहरातील ५५ सहस्र १६ दुकानदारांना नव्याने नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.

आस्थापने आणि दुकाने यांच्या पाट्या मराठीत लावण्याची पुणे महानगरपालिकेची नोटीस !

पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर १ डिसेंबर या दिवशी ‘मनसे’च्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी इंग्रजी भाषेमध्ये असलेल्या नामफलकांची तोडफोड करण्यात आली.

नाशिक येथे मनसेचे मराठी भाषेत पाट्यांसाठी आंदोलन !

नाशिकरोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या दुकानांसमोर घोषणा देत आंदोलन केले. यात प्रतीकात्मक इंग्रजी फलकांच्या छायाचित्राला काळे फासण्यात आले.

१० दिवसांत मराठी पाट्या न दिसल्यास मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल !

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये घुसून मराठी पाट्यांच्या सूत्रावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना अडवून कह्यात घेतले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वृद्धाची फसवणूक !; विनापरवाना भेसळयुक्त दारूची विक्री !…

चोरट्यांनी वृद्धाकडून ३ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, घड्याळ, भ्रमणभाष, तीन टपाल कार्यालयांचे पासबुक, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, रोख १३ सहस्र रुपये असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.

‘दुकानांच्या पाट्या मराठीत लावा, अन्यथा ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू !’

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात. नाहीतर मनसेच्या पद्धतीने दणका देऊ, ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू, अशी चेतावणी देणारे फलक शहरातील चेंबूर येथे लावण्यात आले आहेत.

मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून राज ठाकरे यांच्‍यावरील गुन्‍हा रहित !

वर्ष २०२१ मध्‍ये प्रचाराच्‍या वेळी राज्‍य निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती. त्‍यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला होता.

मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे ‘जश्‍न-ए-दिवाळी’ची विद्युत् रोषणाई  हटवली !

कुर्ला येथील ‘फिनिक्स’ या प्रसिद्ध मॉलच्या बाहेर दिवाळी या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्र ‘शुभ दीपावली’ किंवा ‘दिवाळीच्या शुभेच्छा’ यांऐवजी चक्क ‘जश्‍न-ए-दिवाळी’ अशी इस्लामप्रमाणे शुभेच्छा देणारी विद्युत् रोषणाईची आरास मनसेच्या कार्यकर्त्यांनी मॉलच्या व्यवस्थापकांना हटवण्यास भाग पाडली.