मुंबई – मुंबई विद्यापिठाने शिक्षण शुल्कापेक्षा पाच पट अधिक शुल्क घेण्यात येत असल्याने के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य, एस्.के. सोमय्या कला, विज्ञान आणि वाणिज्य आणि के.जे. सोमय्या विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांना मुंबई विद्यापिठाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी याविषयी तक्रार केली. ७ दिवसांत खुलासा करण्यास विद्यापिठाला सांगण्यात आले आहे.