मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – अकोला येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकाराला अमोल मिटकरी हे उत्तरदायी आहेत. साधी गाडी फोडली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पाटील म्हणतात की, राज ठाकरे यांना अटक करून खटला भरा, मग एखादा मृत्यू झाला, तर यांच्या नेत्यांना उत्तरदायी धरले पाहिजे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा. अजित पवार यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास आम्हीही आंदोलन करू, अशी थेट चेतावणी मनसेचे नेते प्रकाश महाजन दिली आहे.