छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राला आरक्षणाची आवश्यकता नाही. हिंदुस्थानात महाराष्ट्रासारखे राज्य नाही. शिक्षणापासून उद्योग धंद्यांपर्यंत येथे सारे उपलब्ध आहे. बाहेर राज्यातील लोकांना ते सारे मिळत आहे. राज्यातील मुलामुलींसाठी त्याचा नीट वापर झाला, तर येथे आरक्षणाची आवश्यकताच नाही, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
पुढच्या ३ महिन्यांत दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे !
या वेळी ते म्हणाले की, जेम्स लेन प्रकरणापासून याची शरद पवारांनी जातीचे राजकारण चालू केले. स्वतःच्या जातीविषयी प्रेम वर्षानुवर्षे येथे आहे; परंतु दुसर्या जातीविषयी द्वेष निर्माण करण्याचे काम त्यांनी चालू केले. पुढच्या ३ महिन्यांत जेवढ्या दंगली घडवता येतील तेवढ्या घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे.