‘यज्ञाचा सकारात्मक परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होतो’, हे सर्वश्रुत आहे. महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वर्ष २०१८ पासून अनेक यज्ञयाग करण्यात आले. या यज्ञयागांच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने विपुल संशोधन केले आहे. या संशोधनातून ‘यज्ञयाग केल्याने यज्ञकुंड, यज्ञाचे यजमान अन् पुरोहित, यज्ञातील विविध घटक, तसेच सभोवतालचे वातावरण यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, हे सिद्ध झाले आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या नवचंडी यागाचा यागातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे
‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत ‘नवचंडी याग’ करण्यात आला.