सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांच्या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘व्यक्तीची स्पंदने तिच्या देहातून वातावरणात प्रक्षेपित होतात. व्यक्तीची स्पंदने तिच्या हाता-पायांच्या कापलेल्या नखांमध्येही विद्यमान असतात. संतांमध्ये मुळातच पुष्कळ चैतन्य असते. त्यांच्या हाता-पायांच्या कापलेल्या नखांतूनही वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे अत्युच्च पातळीचे समष्टी संत आहेत. काळानुरूप त्यांच्याकडून शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात. मे २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हाता-पायांच्या कापलेल्या नखांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे चाचण्या करण्यात आल्या. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या नखांच्या नोंदींचे विश्लेषण पुढे दिले आहे. 

टीप : ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ने मोजण्या करतांना चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने २.३ किलोमीटरपेक्षा अधिक असलेल्या प्रभावळी लोलकाने मोजण्यात आल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर विलक्षण वाढ होणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. मे २०२१ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) ३३० ते ९५६ मीटर (म्हणजे ०.३ ते ०.९ किलोमीटर) होती. वर्ष २०२२ च्या अखेरीस, म्हणजे डिसेंबरमध्ये ती १८.७ ते ३३.४ किलोमीटर झाली. वर्ष २०२३ च्या अखेरीस त्यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा ३१३.४ ते ३६१.५ किलोमीटर होती आणि मार्च २०२४ मध्ये ती ४६८.६ ते ५४१.६ किलोमीटर झाली. यातून ‘मे २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या नखांतील चैतन्यात उत्तरोत्तर विलक्षण वाढत होत गेली’, असे लक्षात येते.

१ अ. विश्लेषण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. काळानुरूप आणि कार्यानुरूप त्यांच्यामध्ये विविध देवतांची तत्त्वे कार्यरत होत आहेत. गत २४ वर्षांपासून चालू असलेला सूक्ष्मातील हा घनघोर संग्राम आता सूक्ष्मातून स्थुलाकडे मार्गक्रमण करत आहे. तीव्र आपत्काळ जवळ येत असल्याचे हे दर्शक आहे. सूक्ष्मातील बलाढ्य वाईट शक्तींचे निर्दालन आणि साधकांचे रक्षण करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील चैतन्य उत्तरोत्तर अधिक प्रमाणात कार्यरत झाले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हाता-पायांच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा परिणाम त्यांच्या नखांवर झाला आहे. यामुळे त्यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर विलक्षण वाढ होत गेल्याचे नोंदींतून दिसून आले.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा ऑगस्ट २०२२ मध्ये, म्हणजे अवघ्या एका मासात तिपटीहून अधिक वाढणे 

जुलै २०२२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा ५.५ ते ७.२ किलोमीटर होती. त्यानंतर केवळ एका मासात, म्हणजे ऑगस्ट २०२२ मध्ये तिच्यात पुष्कळ वाढ होऊन ती १५.१ ते ३०.६ किलोमीटर झाली. केवळ एका मासात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांतील चैतन्यात एवढी भरीव वाढ होणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

२ अ. विश्लेषण : सूक्ष्मातील युद्धात मोठ्या वाईट शक्तींचा जोर वाढतो, तसे त्यांना रोखायला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांतील चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत होते. याचा परिणाम म्हणून ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या हाता-पायांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा केवळ एका मासात तिपटीहून अधिक वाढली. यातून सूक्ष्मातील युद्धाची तीव्रता लक्षात येते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जेत  जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पुष्कळ चढउतार दिसून येणे

जुलै २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा १६४.४ ते २११.२ किलोमीटर होती. सप्टेंबर २०२३ मध्ये ती ८२.८ ते १०३.८ किलोमीटर झाली, म्हणजे आधीच्या तुलनेत पुष्कळ घटली. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा ३१३.४ ते ३६१.५ किलोमीटर झाली, म्हणजे आधीच्या तुलनेत ती पुष्कळ वाढली. यातून ‘जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत त्यांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ चढउतार दिसून आले’, असे लक्षात येते.

३ अ. विश्लेषण : जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्तींनी प्राणपणाने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर सूक्ष्मातून जीवघेणी आक्रमणे केली. याचा तात्कालिक परिणाम म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची प्राणशक्ती न्यून होऊन त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असे. तेव्हा देवता आणि काही संत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना साहाय्य करण्यासाठी कार्यरत होत असत. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवरील अरिष्ट दूर होऊन त्यांचे आरोग्य सुधारत असे. या सूक्ष्मयुद्धाचा तात्कालिक परिणाम म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जेत जुलै २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पुष्कळ चढउतार दिसून आले. यातून सूक्ष्मातील युद्ध कसे चालते, हे लक्षात येते.

सौ. मधुरा कर्वे

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उजव्यापेक्षा त्यांच्या डाव्या हाता-पायाच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा अधिक असणे

साधारणतः व्यक्तीच्या डाव्या भागापेक्षा तिच्या उजव्या भागाकडील अवयवात अधिक शक्ती असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या विषयी मे २०२१, जुलै २०२२ आणि ऑगस्ट २०२२ मध्ये असे दिसून येते. डिसेंबर २०२१, नोव्हेंबर २०२२ ते मार्च २०२४ पर्यंत मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या उजव्यापेक्षा त्यांच्या डाव्या हाता-पायाच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा अधिक असल्याचे दिसून येते. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

४ अ. विश्लेषण : शरिराच्या डाव्या बाजूला चंद्रनाडी, तर उजव्या बाजूला सूर्यनाडी असते. चंद्रनाडी शीतल, तर सूर्यनाडी तेजस्वी आणि प्रखर असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची चंद्रनाडी ही त्यांचे सूक्ष्मातील कार्य, तर त्यांची सूर्यनाडी ही त्यांचे स्थुलातील कार्य दर्शवते. दोन्ही नाड्यांचे कार्य निरनिराळे आहे. काळानुरूप आणि कार्यानुरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यासाठी आवश्यकतेप्रमाणे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत असतात. याचा परिणाम त्यांच्या हाता-पायांच्या नखांवर होतो.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पायांपेक्षा त्यांच्या हातांच्या नखांतील सकारात्मक ऊर्जा अधिक असणे

साधारणतः व्यक्तीच्या हातांपेक्षा तिच्या पायांमध्ये अधिक शक्ती असते; पण जुलै २०२३ आणि मार्च २०२४ मध्ये मात्र सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या संदर्भात याउलट झाल्याचे दिसून आले.

५ अ. विश्लेषण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या पायांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य पाताळाच्या दिशेने जाऊन तेथील मोठ्या वाईट शक्तींशी युद्ध करून त्यांना नष्ट करते, तर त्यांच्या हातांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे साधकांभोवती आशीर्वादस्वरूप संरक्षक कवच निर्माण होते. सूक्ष्मातील युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत स्थुलातील आपत्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे साधकांभोवती संरक्षककवच निर्माण होण्यास आरंभ झाले आहे. साधकांनी येणार्‍या आपत्काळात तरून जाण्यासाठी श्रीगुरूंना श्रद्धेने संपूर्णपणे शरण जाऊन स्वत:ची साधना वाढवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना हे चैतन्य ग्रहण करता येईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे अवतारी कार्य अखंड चालू आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांच्या केलेल्या संशोधनातून समाजाला काही अंशी तरी त्यांचे सूक्ष्मातील कार्य समजून घेता यावे, म्हणून हा लेखप्रपंच ! सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेने हे लिखाण करता आले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.११.२०२४)