नवरात्रीच्या काळात महर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या यागांच्या संदर्भातील संशोधन !
‘महर्षींच्या आज्ञेने ऑक्टोबर २०२४ मध्ये नवरात्रीतील पहिले ६ दिवस श्री शाकंभरीदेवीचा याग, त्यापुढील ३ दिवस श्री चंडीदेवीचा याग आणि विजयादशमीला महामृत्युंजय याग करण्यात आले. प्रतिदिन यागाची लघुपूर्णाहुती आणि विजयादशमीला महापूर्णाहुती करण्यात आली. या यागांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. यागांतील काही निवडक घटकांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. लेखाच्या १ ल्या भागात आपण ‘श्री शाकंभरीदेवी यागा’चा यागातील घटकांवर काय परिणाम झाला ?’, हे पाहूया.
(भाग १)
१. श्री शाकंभरीदेवी यागाचा यागातील घटकांवर सकारात्मक परिणाम होणे
श्री शाकंभरीदेवी यागाच्या १ ल्या दिवशी काही निवडक घटकांच्या यागापूर्वी आणि यागानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या घटकांमध्ये यागापूर्वी आणि यागानंतरही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या घटकांमध्ये यागापूर्वी सकारात्मक ऊर्जा होती आणि यागानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत अनेक पटींनी वाढ झाली. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
टीप : ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे यागातील घटकांची प्रभावळ मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने ३० मीटर पुढील प्रभावळी लोलकाने मोजण्यात आल्या.
टीप – आश्रमात ज्या ठिकाणी भाज्या, फळे इत्यादींची साठवणूक करतात ती जागा
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१ अ. यागानंतर श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत अनुमाने ७ पटींनी वाढ होणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जेथे देवतेचे चित्र (रूप) असते, तेथे तिच्याशी संबंधित स्पंदने (शक्ती) असते. श्री दुर्गादेवी, श्री शांकभरीदेवी या देवता आदिशक्तीची रूपे आहेत. श्री शांकभरीदेवी यागातील पूजेच्या मांडणीत पहिले २ दिवस आदिशक्तीचे रूप असलेल्या श्री दुर्गादेवीचे चित्र ठेवण्यात आले होते. हा याग
श्री शाकंभरीदेवीच्या कृपेसाठी करण्यात येत होता. यागाच्या वेळी आदिशक्तीचे एक रूप असलेल्या श्री शांकभरीदेवीचे तत्त्व (चैतन्य) आदिशक्तीचेच एक रूप असलेल्या श्री दुर्गादेवीच्या चित्रात आकृष्ट होऊन ते कार्यरत झाले. त्यामुळे यागानंतर श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
१ आ. यागातील चैतन्याचा अन्य रंगाच्या वस्त्राच्या तुलनेत तांबड्या रंगाच्या वस्त्रावर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे : महर्षींनी यागातील प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितले होते, उदा. १ ल्या दिवशी तांबड्या (लाल) रंगाचे वस्त्र, २ र्या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र इत्यादी. ‘यागातील चैतन्याचा विशिष्ट दिवशी विशिष्ट रंगाच्या वस्त्रावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी एक संशोधनात्मक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात यज्ञस्थळी एका पटलावर तांबड्या रंगाचे वस्त्र आणि तुलनेसाठी अन्य रंगाचे (गडद निळ्या रंगाचे) वस्त्र ठेवण्यात आले. यागापूर्वी आणि यागानंतर दोन्ही वस्त्रांच्या चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही वस्त्रांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर लक्षात आले की, यागातील चैतन्याचा अन्य रंगाच्या वस्त्राच्या तुलनेत तांबड्या रंगाच्या वस्त्रावर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम झाला आहे. ‘नवरात्रीच्या काळात प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे रूप कार्यरत असते. यागाच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी देवीचे ते ते तत्त्व (चैतन्य) साधकांना सहजरित्या ग्रहण करता यावे, यासाठी महर्षींनी त्या त्या दिवशी देवीच्या त्या त्या रूपाशी संबंधित रंगाचे वस्त्र परिधान करण्यास सांगितले’, असे जाणवले.
१ इ. श्री शाकंभरीदेवी यागाचा भाज्या, फळे आणि धान्य यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : श्री शाकंभरीदेवी ही भाज्या (शाक), फळे, धान्य इत्यादी प्रदान करणारी देवता आहे. श्री शाकंभरीदेवी यागाचा उद्देश ‘पुढील कठीण काळात साधकांना अन्न-धान्याची कमतरता भासू नये’, हा होता. ‘श्री शाकंभरीदेवी यागाचा भाज्या, फळे आणि धान्य यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यात आले. यासाठी यज्ञ परिसरात, तसेच आश्रमातील ‘शाक विभागा’त एका ताटात काही निवडक भाज्या, फळे आणि धान्य ठेवून त्यांच्या यागापूर्वी आणि यागानंतर चाचण्या करण्यात आल्या. यागानंतर दोन्ही ठिकाणी ठेवलेल्या भाज्या, फळे आणि धान्य यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढल्याचे दिसून आले. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. यज्ञाच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंवर सकारात्मक परिणाम होणे स्वाभाविक आहे; पण आश्रमातील ‘शाक विभाग’ हा यज्ञ परिसरापासून काही मीटर अंतरावर आणि आतील बाजूस आहे. असे असूनही शाक विभागातील भाज्या, फळे आणि धान्य यांच्यावरही पुष्कळ सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. यातून ‘यज्ञाच्या उद्देशानुसार त्याचा सूक्ष्म परिणाम यज्ञाशी संबंधित घटकांवर कशा प्रकारे होत असतो’, हे लक्षात येते. ‘या यागाच्या माध्यमातून श्री शाकंभरीदेवीने येणार्या कठीण काळात साधकांना अन्न-धान्याची कमतरता भासणार नाही, असा कृपाशीर्वाद दिला’, असे जाणवले.
२. यागाच्या वेळी श्री शाकंभरीदेवीच्या चित्रात श्री शाकंभरीदेवीचे तत्त्व आकृष्ट होऊन ते कार्यरत होणे
यागाच्या ३ र्या दिवसापासून यागाच्या ठिकाणी केलेल्या पूजेच्या मांडणीत श्री शाकंभरीदेवीचे चित्र ठेवण्यात आले. श्री शाकंभरीदेवीच्या चित्राच्या ८.१०.२०२४ या दिवशी यागापूर्वी आणि यागानंतर चाचण्या करण्यात आल्या. या नोंदीतून यागानंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. या नोंदी पुढे दिल्या आहेत.
वरील नोंदीतून लक्षात येते की, यागाच्या ३ र्या दिवशी (५.१०.२०२४ या दिवशी) यागापूर्वी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा १०० मीटर होती. ८.१०.२०२४ या दिवशी यागापूर्वी ती ६२० मीटर होती आणि यागानंतर ती ९४५ मीटर झाली. याचे कारण हे की, प्रत्येक दिवशी म्हणजे ५,६, ७ आणि ८ ऑक्टोबर या दिवशी यागाच्या वेळी श्री शाकंभरीदेवीच्या चित्रात श्री शाकंभरीदेवीचे तत्त्व (चैतन्य) उत्तरोत्तर अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन ते कार्यरत झाले.’
(लेखाच्या पुढील भागात आपण ‘आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर नवरात्रातील यागांचा काय परिणाम झाला ?’, हे पाहू.)
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (२०.११.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |