काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचे भारतापेक्षा पोर्तुगालवर अधिक प्रेम ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा

काँग्रेसच्या उमेदवाराचे सालाझारशाहीवर प्रेम आहे. तो नेमके काय बोलतो आणि त्याचे विचार कसे आहेत, हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोक अशा लोकांना थेट घरी बसवणार आहेत.

PM Modi In Goa : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सांकवाळ (गोवा) येथे सभा

या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गोवा विभागाने आज राष्ट्रीय महामार्ग ५६६ वर दाबोळी विमानतळ जंक्शन ते बिर्ला क्रास जंक्शन या मार्गावर काही ठिकाणी रस्ता बंद, तर काही ठिकाणी वाहतुकीत पालट केल्याचे कळवले आहे.

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे ! – छ. उदयनराजे भोसले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसने काय नाही केले ? याची सूची मोठी आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे, असे वक्तव्य  भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी येथे केले.

मावळ (पुणे) लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या ६८ तक्रारी प्राप्त !

उमेदवारांची अर्ज प्रक्रिया चालू होण्यापूर्वी ५२ तक्रारी आणि त्यानंतरच्या ८ दिवसांमध्ये १६ तक्रारींची वाढ झालेली आहे. त्यातील १३ तक्रारींवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, तर ५५ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे.

हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

बलसा खुर्द (जिल्हा परभणी) येथे २६ एप्रिलला मतदानाच्या वेळी १ सहस २९५ ग्रामस्थांनी गावात कामे करण्यात आली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला होता; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी आश्वासन दिल्यावर मतदान केले.

संपादकीय : ‘नोटा’ची वाढ चिंताजनक !

मतदारांकडून ‘नोटा’चा अधिकाधिक वापर होणे, हे जनताभिमुख उमेदवार देऊ न शकणार्‍या राजकीय पक्षांसाठी लज्जास्पद !

उतावीळ काँग्रेस

‘काँग्रेसचे घोषणापत्र आणि तिच्या नेत्यांची वक्तव्ये यांचा एकत्र विचार झाला पाहिजे’, असा सापळा नरेंद्र मोदी यांनी रचला. काँग्रेस पक्ष धावत येऊन सापळ्यात अलगद अडकला.

Bajrangdal Chikmagalur : चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या माजी पदाधिकार्‍यांना तडीपारीचा आदेश !

काँग्रेस सरकार हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांध मुसलमानांना तडीपार करण्याचा आदेश कधीच देत नाही, हे लक्षात घ्या !

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !

नाशिक लोकसभा जागावाटपात मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेचा अर्ज मागे घेतल्यानंतर विविध घडामोडी घडत आहेत.

Loksabha Elections 2024 : धर्माच्या आधारे मते मागण्याच्या आरोपावरून भाजपचे तेजस्वी सूर्या यांच्यावर गुन्हा नोंद !

निवडणूक आयोगाच्या कर्नाटक राज्याच्या अध्यक्षांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून पोस्ट करत म्हटले की, सूर्या यांनी सामाजिक माध्यमांवरून एक व्हिडिओ प्रसारित करून धर्माच्या आधारावर मते मागण्याचा प्रयत्न केला आहे.