कोरेगाव भीमा प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली !

प्रकाश आंबेडकर

पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्यीय आयोग स्थापन केला आहे. या आयोगाकडून मुंबई आणि पुणे येथे उलट पडताळणी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही उपस्थित रहाण्याचे आदेश आयोगाने दिले होते, तर विश्वास नांगरे पाटील यांचीही आयोगासमोर उलट पडताळणी पूर्ण झाली. दंगल झाली, त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये होते. त्यांना दंगलीसंदर्भात माहिती मिळाली नाही का ? आणि माहिती होती, तर मग ती त्यांनी दाबून का ठेवली ? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ‘शिवशक्ती दर्शन’ दौर्‍याच्या संदर्भातही त्यांनी भाष्य केले.