हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्‍यावर असलेली ७ मंदिरे अवैध असल्याचे सांगत उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. पाडलेल्या मंदिरांत एक १०० वर्षे प्राचीन मंदिर आहे.

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील तलावाच्या किनार्‍यावरील १०० वर्षे प्राचीन मंदिरासह ७ मंदिरे नगरपालिकेकडून उद्ध्वस्त !

तामिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने अशा घटना घडल्यास आश्‍चर्य ते काय ? द्रमुक पक्ष कधीतरी अन्य धर्मियांच्या अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?

पाक सरकार हिंदूंचे मंदिर जाळणार्‍या ३५० जणांवरील गुन्हे मागे घेणार !

यावरून पाक अल्पसंख्य हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात करत असलेली कारवाई ही केवळ दाखवण्यापुरती असते, हेच सिद्ध होते ! भारताने याचा निषेध करून पाकला दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडावे, तरच तेथील हिंदूंना भारताचा आधार वाटेल !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम

सरकारीकरण केलेल्या देवस्थानातील भ्रष्टाचाराची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे. यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची आवश्यकता लक्षात येते.

हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’, अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी’, ‘संघी’ असे म्हटले जाते.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर एकाच पद्धतीने होणारे आघात म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकात ५-६ चर्चवर केवळ दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर भारतातील चर्च धोक्यात असल्याचा प्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवला गेला; पण शेकडो मंदिरांवर आक्रमणे होऊनही त्याला गांभीर्याने घेतले जात नाही.

आता भारतातील सर्व राज्यांत असे करण्याची चढाओढ लागली, तर आश्चर्य वाटायला नको ! हिंदू निद्रिस्त असल्यामुळे पुढे ‘विवाह इत्यादी विधीही ब्राह्मणेतरांना करावेत’, असा कायदा आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

‘तमिळनाडूतील नवनिर्वाचित द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाच्या सरकारने १०० दिवसांत राज्यातील मंदिरांमध्ये २०० ब्राह्मणेतर पुजार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच १०० दिवसांचा ‘शैव अर्चक’ (पुजारी) अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुणीही पुजारी होऊ शकतो. या नियुक्त्या ‘तमिळनाडू हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल एंडॉमेंट डिपार्टमेंट’च्या (हिंदु धार्मिक आणि … Read more

पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

राज्यात द्रमुकचे सरकार आल्यापासून हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ !

शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे !

हिंदूंची देवस्थाने भक्तांकडे नव्हेत, तर राजकीय पक्षांच्या कह्यात देणे, हा हिंदु धर्मावरील घोर अन्याय होय. केवळ आर्थिक उत्पन्न देणारी मंदिरे कह्यात घेऊन दूरवस्था झालेल्या मंदिरांकडे दुर्लक्ष करणे, हा तुघलकी प्रकारच आहे

विरोबा मंदिरातील (जिल्हा सांगली) ४ मासांपूर्वी चोरून नेलेल्या देवतांच्या मूर्ती चोराने परत आणून दिल्या !

४ मासांपूर्वी बेडग येथील बिरोबा मंदिरातील पितळी घोडे, बकर्‍यांच्या मूर्ती, गाभार्‍यातील ९ किलो वजनाचा पितळी नंदी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.