पाक सरकार हिंदूंचे मंदिर जाळणार्‍या ३५० जणांवरील गुन्हे मागे घेणार !

हिंदूंनी आरोपींना क्षमा केल्याचा सरकारचा दावा !

  • यावरून पाक अल्पसंख्य हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात करत असलेली कारवाई ही केवळ दाखवण्यापुरती असते, हेच सिद्ध होते ! भारताने याचा निषेध करून पाकला दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडावे, तरच तेथील हिंदूंना भारताचा आधार वाटेल !
  • इस्लामी देश पाकमध्ये असेच होणार. यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ! आता याविषयी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी काहीच बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

पेशावर (पाकिस्तान) – गेल्या वर्षी येथे एक हिंदु मंदिर जाळल्याच्या प्रकरणी पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ३५० आरोपींवरील गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दावा केला आहे, ‘स्थानिक हिंदूंनी या आरोपींना क्षमा केल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत.’ प्रांताच्या आंतरिक विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, हे प्रकरण सोडवण्यासाठी सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत हिंदूंनी आरोपींना क्षमा करण्याचा निर्णय घेतला. हिंदूंचे म्हणणे आहे की, सरकारच्या आश्‍वासनानंतरही मंदिराचे पुर्नबांधकाम करण्यास विलंब होत आहे. यामुळे हिंदूंमध्ये अस्वस्थता आहे.

१. येथील मानवाधिकार कार्यकर्ते हारून सराब दियाल म्हणाले की, आम्ही शांततेच्या विरोधात नाही; मात्र गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात जसे प्रयत्न केला गेले, ते अयोग्य आहेत. या प्रकरणी ‘पाकिस्तान हिंदू काऊन्सिल’चे अध्यक्ष डॉ. रमेश वांकवाणी यांचा अपवाद वगळता अन्य हिंदूंना विश्‍वासात घेण्यात आले नाही.

२. टेरी कारक जिल्ह्यातील परमहंस यांची समाधी आणि मंदिर यांची तोडफोड करून त्यांना आग लावण्यात आली होती. या प्रकरणी ३५० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी ९२ पोलिसांना निलंबित करण्यात आले होते.