आता भारतातील सर्व राज्यांत असे करण्याची चढाओढ लागली, तर आश्चर्य वाटायला नको ! हिंदू निद्रिस्त असल्यामुळे पुढे ‘विवाह इत्यादी विधीही ब्राह्मणेतरांना करावेत’, असा कायदा आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

‘तमिळनाडूतील नवनिर्वाचित द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाच्या सरकारने १०० दिवसांत राज्यातील मंदिरांमध्ये २०० ब्राह्मणेतर पुजार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच १०० दिवसांचा ‘शैव अर्चक’ (पुजारी) अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुणीही पुजारी होऊ शकतो. या नियुक्त्या ‘तमिळनाडू हिंदू रिलीजियस अँड चॅरिटेबल एंडॉमेंट डिपार्टमेंट’च्या (हिंदु धार्मिक आणि धर्मादाय संपत्ती विभागाच्या) अंतर्गत येणार्‍या ३६ सहस्र मंदिरांत होणार आहेत.’