
भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’, अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी’, ‘संघी’ असे म्हटले जाते. ‘आंध्रप्रदेशमधील २४ सहस्र ६३२ हिंदु मंदिरे सरकारने कह्यात घेतली’, असे मी मानतो. या सर्व मंदिरांची ४ लाख एकर भूमी शासकीय अधिपत्याखाली आहे. यात १ लाख एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले अन् हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली. वास्तविक धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावण्याचा कोणताही अधिकार नाही. जर सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर हे राष्ट्र हिंदु राष्ट्र करावे आणि मग शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी. राज्यघटनेनुसार सरकार आणि शासकीय संस्था यांनी एकसंध राहून कोणताही भेद न करता कार्य करायला हवे; मात्र सरकार एका विशिष्ट धर्माकडे झुकलेले दिसते. हे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण नाही.
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !