पुडुकोट्टई (तमिळनाडू) येथे अज्ञातांकडून प्राचीन शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड

राज्यात द्रमुकचे सरकार आल्यापासून हिंदु धर्मावरील आघातांमध्ये वाढ !

द्रविड स्वतःला हिंदूंपासून वेगळे समजत असल्याने आणि द्रमुक पक्ष हिंदुविरोधी असल्याने अशा घटना घडत असणे, यास आश्‍चर्यकारक म्हणता येणार नाही. भारत धर्मनिरेपक्ष देश असला, तरी हिंदूंच्या व्यतिरिक्त अन्य धर्मीय धर्मनिरपेक्षतेचे पालन करत नाहीत आणि जन्महिंदूंपैकी मोठ्या संख्येने हिंदू स्वतःला पुरोगामी समजतात. त्यामुळे हिंदु धर्माचे रक्षण होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावरच पालटता येईल !

कीझनांचूर गावामधील प्राचीन कैलासनाथ मंदिरातील शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

पुडुकोट्टई (तमिळनाडू) – येथील कीझनांचूर गावामधील प्राचीन कैलासनाथ मंदिरातील शिवलिंग आणि भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. शिवलिंगाचे दोन तुकडे करण्यात आले, तर शिवाच्या मूर्तीचे शिर तोडण्यात आले. हे मंदिर चोल राजाच्या काळात बांधण्यात आले आहे. या मंदिरात श्री गणेश, पार्वतीदेवी, भगवान मुरुगन, भगवान श्रीकृष्ण आणि नंदी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचे दार नेहमीच उघडे ठेवलेले असते. त्यामुळेच अज्ञातांनी याचा अपलाभ घेतल्याचे म्हटले जात आहे. राज्यात द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार आल्यापासून राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आणि धर्मावर आघात होत आहेत, असे हिंदूंकडून सांगितले जात आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक