सिंधुदुर्ग : मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोराने त्यातील रक्कम चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे.

कराड येथील श्री उत्तरालक्ष्मी मंदिराच्या मिळकतीवर वक्फ बोर्डाचा डोळा !

श्री उत्तरालक्ष्मी मंदिर परिसरातील जागेवर मुसलमान समाजाची स्मशानभूमी आहे. ती मूळची गायरान पैैकी भूमी असून सातारा जिल्हाधिकारी यांचे हु.नं. एल्.एन्.डी./२४००/१९३१ अन्वये मुसलमान स्मशानभूमीकडे ठेवण्यात आलेली (असाईन) आहे.

जळगावमध्ये हिंदूंच्या मंदिराला विरोध करत धर्मांधांकडून दंगल !

देशभर अनधिकृत मजारी आणि मशिदी उभारणारे; वक्फ बोर्डाच्या माध्यमातून सहस्रो एकर भूमी अनधिकृतपणेबळकावणारे अन् रस्त्यातही नमाजपठण करणारे धर्मांध हिंदूंच्या मंदिराला विरोध करतात, हे लक्षात घ्या !

शाहजहापूर  (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराजवळ अज्ञातांनी टाकले गोमांस !  

हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन !
पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही घडली घटना !

टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील साईबाबा मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरली !

अज्ञात चोरट्याने टाकळीभान येथील श्री साईबाबा मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. ही घटना ३ जुलै या दिवशी घडली. ३ मासांपूर्वी याच मंदिराचा पितळेचा कळस चोरण्यात आला होता.

 ‘कानिफनाथ मंदिर वाचवण्‍याचा कायदेशीर लढा चालू आहे आणि तो चालूच राहील’, असे भाविकांना सांगावे लागते, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद ! प्रशासन स्‍वतः कायदेशीर प्रयत्न का करत नाही ?

‘कानिफनाथ मंदिराची ४० एकर भूमी धर्मांधांनी कह्यात घेतली आहे. वर्ष २००५ मध्‍ये रंगपंचमीच्‍या दिवशी कुणालाही कळू न देता या भूमीवर वक्‍फ बोर्डाने नियंत्रण मिळवले. त्‍यानंतर एक ट्रस्‍ट बनवून त्‍याचे दर्ग्‍यात रूपांतर करण्‍यात आले.

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांची धर्मस्थळे भ्रष्ट केली जात आहेत आणि त्यांच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा कांगावा करणारी अमेरिका आणि इस्लामी देश पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी गप्प का ? याविषयी भारत सरकार पाकला खडसावणार का ?

देहलीत धर्मांध मुसलमानाने मंदिराजवळ टाकले म्हशीचे कापलेले शीर !

देहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी घटना एखाद्या चर्चबाहेर किंवा मशिदीबाहेर घडली असती, तर देहलीमध्ये एव्हाना दंगल उसळली असती ! हिंदु सहिष्णु असल्याने ते असे कृत्य करत नाहीत. तरीही हिंदूंना , , , असहिष्णु ठरवतात !

आंध्रप्रदेशात सरकारीकरण झालेल्या मंदिरांची अतिक्रमण करण्यात आलेली भूमी कह्यात घेण्याचा कायदा संमत !

मूळात मंदिरांचे ‘व्यवस्थापन’ चांगले नसल्याचे सांगून सरकारकडून मंदिरे कह्यात घेतली जातात. नंतर मंदिराच्या भूमीही सरकारला सांभाळता येत नाहीत आणि त्यामुळे त्यावर अतिक्रमण होते ! हे सरकारचे कोणते ‘आदर्श व्यवस्थापन’ आहे ? त्यामुळे मंदिरे भक्तांच्याच कह्यात राहू देण्याचा कायदा असला पाहिजे !