गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याचा प्रयत्न भक्तगणांनी सतर्कतेने हाणून पाडला !

हिंदूंची मंदिरे आता प्रशासनापासूनही असुरक्षित समजायची का ? मंदिर पाडण्यापूर्वी संबंधितांना त्याची कल्पना देणे आणि त्यामागील कारण सांगणे, अशी प्रशासनाची पद्धत आहे कि नाही ?

अक्षरधाम मंदिराजवळ ड्रोन जप्त : बांगलादेशी महिलेची चौकशी !

भारतात कारवाई होण्याचे जराही भय न उरल्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांची आता ड्रोनद्वारे अप्रत्यक्षपणे हेरगिरी करण्यापर्यंत मजल गेली आहे ! हे पोलिसांना लज्जास्पद !

नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील १० किलो वजनाचे सोन्याचे दागिने गायब !

‘पशुपतीनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे संचालक घनश्याम खतिवड म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिरात सुरक्षा कर्मचार्‍यांसह नेपाळी सैन्याचे सैनिक तेथे तैनात करण्यात आले आहेत.

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा देणार ! – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

वस्त्रसंहिता लागू करण्यासह यापुढे मंदिर परिसर स्वच्छ आणि सात्त्विक रहावा, यासाठी तो ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यासाठी लढा दिला जाईल, असा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कोअर समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

तमिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तमिळनाडू

तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला.

मंदिरांत चोरी करणार्‍यांना ओळखा !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे २ मंदिरांमध्‍ये चोरी केल्‍याच्‍या प्रकरणी नईम नावाच्‍या चोरट्याला अटक करण्‍यात आली आहे. त्‍याच्‍याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्‍हे नोंद आहेत. त्‍या प्रकरणी त्‍याला अटकही झाली होती.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्‍या नईम याला अटक !

मंदिरांत कोण चोरी करतो ?, हे जाणा ! सरकारने अशा चोरट्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे !

आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा !

संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरे जपली पाहिजेत. यासाठी गोवा येथे गोमंतक मंदिर महासंघ काम करत आहे, तर महाराष्ट्रात महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची अवहेलना प्रतिदिन चालू आहे. हा मंदिरांच्या सरकारी अधिग्रहणाचा दुष्परिणाम आहे, हे लक्षात घेऊन लवकरात लवकर ही मंदिरे सरकारमुक्त करणे, हाच यावरील एकमात्र उपाय आहे.

गोवा : केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! केपे तालुक्यातील गुडी-पारोडा येथील पर्वतावरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेटी बाहेर आणून फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.