‘कानिफनाथ मंदिराची ४० एकर भूमी धर्मांधांनी कह्यात घेतली आहे. वर्ष २००५ मध्ये रंगपंचमीच्या दिवशी कुणालाही कळू न देता या भूमीवर वक्फ बोर्डाने नियंत्रण मिळवले. त्यानंतर एक ट्रस्ट बनवून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्या भूमीच्या कागदपत्रांवरील कानिफनाथ देवस्थानचे नाव हटवून ‘हजरत रमजान शाह दर्गा’ अशी नोंद केली. याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ग्रामसभा घेतली. त्यात ‘तलाठ्याकडील नोंद रहित करावी’, असा ठराव करण्यात आला. आमच्या १९ लोकांवर वक्फमध्ये खटला प्रविष्ट करण्यात आला. आता आमचा कानिफनाथ मंदिर वाचवण्याचा कायदेशीर लढा चालू आहे आणि तो चालूच राहील.’
– श्री. श्रीहरि आंबेकर, कान्होबा उपाख्य कानिफनाथ देवस्थान, गुहा, महाराष्ट्र. (२७.६.२०२३)