बचत गटातील महिला रिक्शा चालवणार !
मुंबई – मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन ‘नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ आणि ‘टीव्हीएस’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील बचत गटातील ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्शा वाटप करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून महिलांना रिक्शा चालवण्याचे प्रशिक्षण आणि परवाने विनामूल्य देण्यात आले.
वेताळेश्वर देवाच्या मूर्तीची चोरी !
कल्याण – येथील ग्रामीणमध्ये खोणी गावात वेताळेश्वर देवाची मूर्ती आणि समई यांची चोरी करण्यात आली आहे. यामुळे गावकरी संतप्त असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका : हिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित !
नीरा खोर्यातील धरणात ३९ टक्के पाणीसाठा !
पुणे – नीरा खोर्यातील भाटघर, नीरा, देवघर, वीर, गुंजवणी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ८ एप्रिलला १९ सहस्र ९७ दशलक्ष घनफूट (१ सहस्र दशलक्ष घनफूट – धरणातील पाणीसाठा मोजण्याचे एकक) (३९.५१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. भाटघर धरणामध्ये ८ सहस्र ८२९ दशलक्ष घनफूट, नीरा देवघर धरणात ३ सहस्र ४१० दशलक्ष घनफूट, वीर धरणात ५ सहस्र २५० दशलक्ष घनफूट, गुंजवणी धरणात १ सहस्र ६०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. आकडेवारीनुसार चारही धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे.
मिरची बाजाराला भीषण आग !
चाळीसगाव – येथील मिरची बाजाराला दुपारी २ वाजता मोठी आग लागली. यात १२ दुकाने जळून खाक झाली असून ५० लाखांपेक्षा अधिक हानी झाली आहे. एक मालट्रक आणि दुचाकी जळून खाक झाली आहे. यात जवळच असलेल्या पेट्रोलपंपाची काहीच हानी झाली नाही.
डोंबिवली येथे बेशिस्त रिक्शाचालकांवर कारवाई
डोंबिवली, ११ एप्रिल (वार्ता.) – प्रवाशांना भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, ठराविक भाडे ठरवूनच रिक्शा चालवणे, गणवेश न घालता रिक्शा चालवणे अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या प्रकरणी धाड घालून ३५ बेशिस्त रिक्शाचालकांवर कारवाई केली. अनेक रिक्शाचालकांनी गणवेश घातलेला नव्हता. काहींकडे कागदपत्रे नव्हती. (अशी कारवाई वेळोवेळी झाल्यास रिक्शाचालकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाचा धाक राहील ! – संपादक)
अनेक रिक्शाचालक परवान्याची मुदत संपूनही प्रवासी वाहतूक करत होते, तर काही जणांनी वाहन प्रदूषण नियंत्रणाच्या मुदतीचे नूतनीकरण केले नव्हते. दोषी रिक्शाचालकांना घटनास्थळीच ई-चलनाच्या माध्यमातून दंड ठोठावला. अशा प्रकारे मनमानी करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. (याला उपप्रादेशिक परिवहन विभागही तितकाच उत्तरदायी आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका : रिक्शाचालक बेशिस्तपणे वागण्यास उत्तरदायी असणार्या उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्यांनाही शिक्षा होणे आवश्यक !