किराणा दुकानात वाईन विक्रीचा निषेध झाला पाहिजे ! – डॉ. अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, ‘‘वाईन निर्मितीसाठी लागणारी फळे ही केवळ २-३ जिल्ह्यांत होतात. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकर्‍यांना त्याचा लाभ होईल, हा तर्क खोटा आहे.

संतवीर आणि ‘व्यसनमुक्त युवक संघा’चे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अटक नाही ! – सातारा पोलीस

कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस

सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे हा चिंताजनक विषय नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !

(म्हणे) ‘वाईन आणि दारू यांत जमीन-अस्मानाचा फरक !’ – अजित पवार, उपमुख्यमंत्री

हत्या, मारामार्‍या, आत्महत्या, कौटुंबिक हिंसा इत्यादी अनेक गोष्टींमागील मुख्य कारण असलेल्या मद्याचे हे एकप्रकारे समर्थन करणे नव्हे का ? केवळ महसुलासाठी अशा प्रकारची विधाने करून तरुण पिढीला आणखी व्यसनाधीन आणि विकृत करण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल.

किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा सरकारचा निर्णय राष्ट्रघातक आणि समाजाला हानीकारक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला असलेला जनतेचा विरोध लक्षात घेऊन तो निर्णय रहित करावा !

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धार्मिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणी ७ मासांत पावणे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात

अशा प्रकरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ होणे, ही सामाजिकदृष्ट्या खेदाची गोष्ट आहे. उलट सरकार आणि प्रशासन यांनी याविषयी जागरुकता निर्माण करून हे प्रमाण दिवसेंदिवस घटत कसे जाईल हे पहाणे आवश्यक आहे !

नेरूळ येथे गावदेवी मंदिर परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर प्राणघातक आक्रमण; आरोपी अटकेत

नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर मद्यपींकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. ही घटना ४ नोव्हेंबरच्या रात्री घडली असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बुलढाणा येथे मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याने जावयाने सासूचे घर पेटवले ! 

अशा घटना न घडण्यासाठी मद्य उत्पादनावर सरकारने कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे !

संभाजीनगर येथे मद्यधुंदीत २ पोलिसांवर आक्रमण करणार्‍या ‘एन्.एस्.जी’च्या सैनिकाला अटक !

सैनिकाने मद्यधुंदीत पोलिसांशी असे वर्तन करणे लज्जास्पद आहे. अशा सैनिकांना तात्काळ बडतर्फ करायला हवे.