अशा घटना न घडण्यासाठी मद्य उत्पादनावर सरकारने कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे ! – संपादक

बुलढाणा – मद्य पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून जावई अंबादास झालटे याने वृद्ध सासू कस्तुराबाई आणि पत्नी यांना मारहाण करून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकून घर पेटवून दिले. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील टूनकी गावात घडली आहे. यामध्ये घराची पुष्कळ हानी झाली असून सासू आणि सून दोघीही सुखरूप आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सासूच्या तक्रारीवरून अंबादास याला अटक केली आहे. पतीचे निधन झाल्यावर आधार हवा म्हणून कस्तुराबाई यांनी स्वतःची मुलगी आणि जावई अंबादास यांना स्वतःच्या घरी आणले होते; पण जावई अंबादास झालटे याला मद्याचे व्यसन असल्याने तो नेहमी पत्नीला मारहाण करत असे. संग्रामपूर न्यायालयाने अंबादास याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !