सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणी ७ मासांत पावणे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात

अशा प्रकरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ होणे, ही सामाजिकदृष्ट्या खेदाची गोष्ट आहे. उलट सरकार आणि प्रशासन यांनी याविषयी जागरुकता निर्माण करून हे प्रमाण दिवसेंदिवस घटत कसे जाईल हे पहाणे आवश्यक आहे !

नेरूळ येथे गावदेवी मंदिर परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर प्राणघातक आक्रमण; आरोपी अटकेत

नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर मद्यपींकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. ही घटना ४ नोव्हेंबरच्या रात्री घडली असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बुलढाणा येथे मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याने जावयाने सासूचे घर पेटवले ! 

अशा घटना न घडण्यासाठी मद्य उत्पादनावर सरकारने कायमस्वरूपी बंदी घालणे आवश्यक आहे !

संभाजीनगर येथे मद्यधुंदीत २ पोलिसांवर आक्रमण करणार्‍या ‘एन्.एस्.जी’च्या सैनिकाला अटक !

सैनिकाने मद्यधुंदीत पोलिसांशी असे वर्तन करणे लज्जास्पद आहे. अशा सैनिकांना तात्काळ बडतर्फ करायला हवे.

मद्यपी शिपायाच्या चुकीमुळे ग्रामस्थांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास !

मद्य पिऊन येणार्‍या कर्मचार्‍यांवर कुणाचे लक्ष नसते का ? अशा कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?

सोलापूर येथे मुलाने डोक्यात गॅस सिलेंडर फेकून मारल्याने आईचा मृत्यू

नशेमध्ये आपण काय करत आहोत याचे भान न राहिल्याने मनुष्य किती टोकाचे पाऊल उचलतो. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी साधना आणि धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे, हेच या उदाहरणावरुन स्पष्ट होते !

सर्वविनाशी दारू ! 

राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्‍या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्‍या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !

८ मार्चच्या जागतिक महिलादिनी दोन महिलांनी ५१० कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले खेड्यामधील दारूचे दुकान !

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात वावरत आहेत. समाजाला विनाशाच्या वाटेवर नेणार्‍या दारूचे दुकान खरेदी करून समाजाला मद्यपी बनवण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेतला आहे, असे समजायचे का ?

मद्यधुंद अ‍ॅपे रिक्शा चालकाच्या धडकेने २ वर्षांची मुलगी ठार !

मद्यपान करणार्‍यास कितीही कठोर शिक्षा दिली, तरी अपघातातील हानी भरून निघणार नाही. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

चाकणच्या शासकीय रुग्णालयात मद्यपी तरुणांनी केली आधुनिक वैद्य आणि सुरक्षारक्षक यांच्यासह पोलिसाला मारहाण !

स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?