भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मंदिरावरील भोंग्यांवरून उपविभागीय अधिकार्‍यांची मंदिर व्यवस्थापनाला नोटीस !

मशिदींवरील भोंग्यांविषयी तक्रारी केल्यावर उपविभागीय अधिकारी अशीच तत्परतेने कृती करतात का ?

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
असे निर्णय अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी घेण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का ?

‘बारामती ऍग्रो’ कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हा नोंद !

इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील ‘बारामती ॲग्रो’ कारखान्याच्या संचालकांविरुद्ध वेळेअगोदर उसाचा गळीत हंगाम चालू केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० सहस्र टन गहू सरकारी अधिकार्‍यांनी हडपला !

यावरून पाक साहाय्य करण्याच्याही पात्रतेचा नाही, हेच सिद्ध होते. अशा पाकला यापुढे साहाय्य करायचे का ?, हे भारतासह अन्य देशांनी ठरवले पाहिजे !

मूर्तीवरील नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदु समाजाची मागणी

हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे.

नवी मुंबई महापालिका भटक्या मांजरांचीही करणार नसबंदी

सर्व महापालिकांनी असा निर्णय घेण्याविषयी विचार करावा; परंतु भटक्या श्वानांची नसबंदी करण्याची व्यवस्थित प्रक्रिया होत आहे किंवा नाही, याविषयी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिर्‍यांनी सांगितले पाहिजे !

सायबर सिक्युरिटीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

धुळे शहरात भ्रमणभाषवरून शहरातील मुलींची छुप्या पद्धतीने छायाचित्रे काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी अज्ञात असून पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कर्मचार्‍यांची संपाकडे पाठ; केवळ निर्दशने !

ठाणे महानगरपालिकेच्या कामगार संघटनेने केवळ निदर्शने केली, तर कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेत मात्र साधी निदर्शनेही करण्यात आली नाहीत.

राज्यासाठी लवकरच गौण खनिज आणि वाळू धोरण ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून ‘स्टोन क्रशर’ चालवणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग : अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करा !

वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, त्यातील चालीरिती, प्रथा-परंपरा, देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याने एका संबंधित स्थानिक प्रशासनावर हे कार्यक्रम रहित करण्याची वेळ आली होती.