रशियाने पाकिस्तानला पाठवलेला ४० सहस्र टन गहू सरकारी अधिकार्‍यांनी हडपला !

६७ अधिकारी निलंबित !

इस्लामाबाद – आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला रशियाने साहाय्य म्हणून पाठवलेला ४० सहस्र टन गहू पाकमधील सरकारी अधिकार्‍यांनी हडपला. या प्रकरणी पाकने चौकशी करून ६७ अधिकार्‍यांना निलंबित करून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली आहे. पाकिस्तानमध्ये अन्न-धान्याअभावी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून अनेक लोकांची उपासमार होत आहे. अशात सरकारी कर्मचार्‍यांनी नागरिकांना साहाय्य म्हणून पाठवलेला गहू हडपल्याने जनतेत संतापाची लाट पसरली आहे.

संपादकीय भूमिका

यावरून पाक साहाय्य करण्याच्याही पात्रतेचा नाही, हेच सिद्ध होते. अशा पाकला यापुढे साहाय्य करायचे का ?, हे भारतासह अन्य देशांनी ठरवले पाहिजे !