ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कर्मचार्‍यांची संपाकडे पाठ; केवळ निर्दशने !

ठाणे महानगरपालिकेच्या कामगार संघटनेने केवळ निदर्शने केली, तर कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेत मात्र साधी निदर्शनेही करण्यात आली नाहीत.

राज्यासाठी लवकरच गौण खनिज आणि वाळू धोरण ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून ‘स्टोन क्रशर’ चालवणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग : अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करा !

वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, त्यातील चालीरिती, प्रथा-परंपरा, देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याने एका संबंधित स्थानिक प्रशासनावर हे कार्यक्रम रहित करण्याची वेळ आली होती.

‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जलस्रोत अभियंत्यांना घेराव

आंदोलकांनी म्हादईप्रश्नी देखरेख समितीचा अहवाल गोवा सरकारने न्यायालयात सुपुर्द न केल्याचा आरोप करून प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांच्यावर विविध प्रश्नांचा भडिमार करून त्यांना धारेवर धरले.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी !

मुळे मूर्तीची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी १४ मार्चला सकाळी मूर्तीची पहाणी केली, तसेच जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली.

उत्तर प्रदेश : चैत्र नवरात्रीला प्रत्येक जिल्ह्यात दुर्गा सप्तशतीचे पठण होणार !

उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे.

शासकीय कर्मचार्‍यांकडून जुनी पेन्शन योजना चालू करण्याची मागणी

या संपात प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक शाळेत नसल्याने शाळेच्या बाहेर शाळेला सुट्टी असल्याचा फलक लावण्यात आला होता. शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता.

जुन्या पद्धतीनुसार निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक !

शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांना जुन्या पद्धतीप्रमाणे निवृत्तीवेतन (पेन्शन) लागू करावे, या मागणीसाठी १४ मार्च या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले

मुंबईत मार्चच्‍या शेवटी ‘जी-२०’ शिखर परिषद !

मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्‍या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्‍या शेवटी होणार आहे. बैठकीच्‍या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता सत्यात उतरेल ! – अधिवक्ता विलास पाटणे

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांचे हे स्वप्न आता सत्यात उतरेल.